शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या घरी आज ईडीचा छापा, त्यानंतर अटक करू शकते; आपचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 07:51 IST

अबकारी घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीनवेळा नोटीस बजावली होती. तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीला हजर झालेले नाहीत.

अबकारी घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीनवेळा नोटीस बजावली होती. तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीला हजर न झाल्याने आता ईडी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आपच्या नेत्यांनी ईडी आज केजरीवालांना अटक करू शकते, असा दावा केला आहे. 

ईडीने आपल्यावर जे आरोप केले आहेत, त्यावरील प्रश्न लिखित स्वरुपात द्यावेत असे पत्र केजरीवाल यांनी काल तिसऱ्या समन्सला ईडीला दिले आहे. तसेच ईडीची नोटीस बेकादेशीर असल्याचा दावा आपने केला आहे. ईडी केजरीवालांच्या घरी छापा मारू शकते किंवा त्यांना अटक करू शकते असा दावा आपच्या नेत्या मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी केला आहे. 

आज अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकला जाईल आणि त्यांना अटकही केली जाईल, अशी माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. समन्स पाठवण्याची वेळ आणि त्यांना अटक करण्याचा प्लॅन हे लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे. 

आजपर्यंत एक रुपयाही रोख, सोने, चांदी किंवा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. गेल्या वर्षभरापासून तपास सुरु आहे. मग तीन आठवड्यांत तीन समन्स पाठविण्याची एवढी काय घाई झाली, असा सवालही आतिशी यांनी केला आहे. केजरीवाल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहेत, पण ईडीने त्यांना का बोलावले आहे ते सांगावे. साक्षीदार, आरोपी, दिल्लीचे मुख्यमंत्री किंवा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक म्हणून संबोधत आहे. लोकसभा निवडणुकीचा टायमिंग साधूनच एवढी घाईला आले आहेत, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय