शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

चिदम्बरम यांच्यावर आरोपपत्र दाखल, ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 03:50 IST

एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले आहे.

नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले आहे. परकीय गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रकल्पासाठी मंजुरी देण्यासाठी चिदम्बरम यांनी गैरव्यवहार केल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.या खटल्याची पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी होईल, असे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी जाहीर केले. एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणात पी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती याच्या विरोधात ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पुन्हा त्याच्या विरोधात पुरवणी आरोपपत्रही सादर केले. या प्रकरणात पी. चिदम्बरम, कार्ती याचे चार्टर्ड अकाऊंटन्ट एस. भास्करन, एअरसेलचे माजी सीईओ व्ही. श्रीनिवासन, आॅगस्टस राल्फ मार्शल (मॅक्सिसशी संबंधित अधिकारी), अ‍ॅस्ट्रो आॅल एशिया नेटवर्कस् पीएलसी मलेशिया, एअरसेल टेलिव्हेंचर्स लिमिटेड, मॅक्सिस मोबाईल सर्व्हिसेस, भूमी अर्माडा बेरहाड, भूमी अर्माडा नेव्हिगेशन, या आठ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पी. चिदम्बरम यांच्यावर दाखल झालेल्या आरोपपत्राबद्दल काँग्रेसने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.>बेकायदा निर्णयाला मंजुरी?परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या एफआयपीबीने एअरसेल- मॅक्सिस प्रकल्पातील बाबींना बेकायदेशीर मंजुरी दिली. त्या निर्णयाला तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी मार्च २००६ मध्ये परवानगी दिली. या प्रक्रियेत १.१६ कोटी रुपये मॉरिशसमधील ग्लोबल कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस लिमिटेडला देण्यात आले. हे मनी लाँड्रिंग भारत सरकारच्या थेट परकीय गुंतवणूक धोरणाच्या नियमांविरुद्ध होते.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम