शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

ED चे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपला; राहुल नवीन यांच्याकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 21:30 IST

New ED Director: अंमलबजावणी संचालनालय(ED) प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज(15 सप्टेंबर) रोजी संपत आहे.

Rahul Navin New ED Director: अंमलबजावणी संचालनालय(ED) प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज, म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी संपत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांची ईडीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. कार्यकारी संचालकांचा आदेश शुक्रवारी रात्री उशिरा किंवा उद्या शनिवारी सकाळी औपचारिकपणे येण्याची शक्यता आहे. संजय कुमार मिश्रा यांनी सुमारे 4 वर्षे 10 महिने ईडीचे संचालक म्हणून काम केले.

कोण आहेत राहुल नवीन?राहुल नवीन हे 1993 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. विशेष संचालक असण्याव्यतिरिक्त, राहुल नवीन ईडी मुख्यालयात मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम करतात. रिपोर्टनुसार, नव्या संचालकाची औपचारिक नियुक्ती होईपर्यंत ते प्रभारी संचालकपदाची जबाबदारी पार पाडतील.

एसके मिश्रा यांना तीन वेळा मुदतवाढ संजय कुमार मिश्रा यांची 2018 मध्ये ईडी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपणार होता. केंद्राने त्यांना तीन वेळा सेवेत मुदतवाढ दिली. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले होते.

न्यायालयाने विस्तार बेकायदेशीर ठरवला संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी CVC कायद्यातही सुधारणा करण्यात आली. गेल्या जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने संजय कुमार मिश्रा यांची तिसरी मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली होती. त्यांना 31 जुलैपर्यंत पद सोडावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले होते. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत या पदावर कायम राहण्याची परवानगी देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यावर न्यायालयाने त्यांना15 सप्टेंबरपर्यंत पदावर राहण्यास परवानगी दिली.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCentral Governmentकेंद्र सरकार