शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! केजरीवाल सरकारला धक्का, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 'ईडी'कडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 20:09 IST

दिल्लीतील 'आप' सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रींगप्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीतील 'आप' सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रींगप्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ईडीनं ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती. आता थेट अटकेची कारवाई झाल्यानं केजरीवाल सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ईडीच्या कारवाईवरुन थेट भाजपावर निशाणा साधला आहे. "सत्येंद्र जैन यांच्याविरोधात ८ वर्षांपासून एक बनावट केस चालवली जात आहे. आतापर्यंत अनेकदा ईडीनं त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर मधल्या काळात ईडीनं त्यांना बोलावणंच बंद केलं होतं. कारण त्यात ईडीला काहीच सापडलं नव्हतं. आता पुन्हा त्यांनी जैन यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कारण ते हिमाचल निवडणुकीत आपचे निवडणूक प्रभारी आहेत", असं ट्विट मनिष सिसोदिया यांनी केलं आहे. तसंच हिमाचलमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार आहे आणि त्यामुळेच सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. जेणेकरुन ते हिमाचलला जाता कामा नयेत, असाही आरोप मनिष सिसोदिया यांनी केला आहे. 

नेमकं प्रकरण काय?सत्येंद्र जैन यांनी 2015-16 मध्ये तीन खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा मिळविल्याचा आरोप आहे. प्रायाज इन्फो सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अकिनन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनगलियातन प्रोजक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमधून कथितरित्या कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा या कंपनांमधून शेअर आहेत. 

दरम्यान, सत्येंद्र जैन यांच्यावर 11.78 कोटीचा हवाल्याचाही आरोप आहे. 2010-12 दरम्यान बनावट कंपन्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इन्कम टॅक्स विभागाने बेनामी संपत्ती कायद्याच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडे आहे. सीबीआय सुद्धा त्यांची चौकशी करत आहे. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल