शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुखवार्ता: अर्थव्यवस्था जोमात, चालू तिमाहीत वाढणार नाेकरभरतीचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:28 IST

उद्योगसमूहांना भासू लागली अधिक मनुष्यबळाची गरज

नवी दिल्ली : देशातील उद्याेगधंदे आणि व्यवसायांची गाडी रुळावर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही मागणी वाढू लागली आहे. ऑक्टाेबर ते डिसेंबर या तिमाहीत नाेकर भरती टाॅप गिअरमध्ये राहणार  आहे. कंपन्यांकडून हाेणारी भरती गेल्या १८ महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.टीमलीझ एम्प्लाॅयमेंट आउटलूक रिपाेर्टमध्ये कंपन्यांमधील नाेकरभरतीचा आढावा घेण्यात आला आहे. देशातील २१ क्षेत्रांमधील लघू, मध्यम आणि माेठ्या अशा ६५० कंपन्यांमधील मागणीबाबत सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यानुसार ४१ टक्के कंपन्या तिसऱ्या तिमाहीत नाेकरभरती करण्याच्या विचारात आहेत. हे प्रमाण जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत ३८ टक्के हाेते, तर गेल्यावर्षी हेच प्रमाण १८ टक्के एवढेच हाेते. अहवालानुसार, कनिष्ठ पातळीवर ३४ टक्के, वरिष्ठ पातळीवर २७ आणि मध्य पातळीवर २४ टक्के भरती करण्याचा कंपन्यांचा विचार आहे. गेल्या महिन्यात मॅनपाॅवर ग्रुप एम्प्लाॅयमेंट आउटलूक सर्व्हेमध्येही ऑक्टाेबर-डिसेंबर या तिमाहीत राेजगार भरतीत वाढ हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता.बेंगळुरूमध्ये ६७ टक्के, दिल्लीत ५९, हैदराबादमध्ये ५३, पुण्यात ४६ आणि चेन्नई येथे ४५ टक्के भरती हाेणार असल्याचा अंदाज आहे.आयटी क्षेत्रात सर्वाधिक मागणीक्षेत्रनिहाय विचार केल्यास आयटी क्षेत्रात सर्वाधिक मागणी राहणार आहे. आयटी क्षेत्राकडून ६९ टक्के, शैक्षणिक क्षेत्रात ६४ टक्के, फार्मामध्ये ६१, एफएमसीजीमध्ये ५९ आणि ई-काॅमर्समध्ये ५७ टक्के भरती हाेण्याची शक्यता आहे.तिसऱ्या लाटेची भीती झाली कमीकंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बाेलाविण्याची तयारी कंपन्यांकडून हाेत आहे. व्यापक लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची भीती कमी झाल्याने उद्याेगधंद्यांची गाडी रुळावर येत आहे. सणासुदीच्या काळात मागणीही जाेर धरू लागली आहे. त्यामुळे व्यवसायवृद्धीसाेबतच मनुष्यबळाची मागणीही पूर्ण करण्याची तयारी कंपन्यांनी केली आहे.