शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर, 2022-23 मध्ये GDP 8-8.5 टक्के राहण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:08 IST

Economic Survey: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. यावेळी त्यांनी आर्थिक वर्ष 2022 चे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

नवी दिल्ली: आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Parliament Budget Session 2022) सुरू झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सादर करण्यात आले. आर्थिक सर्वेक्षण हे चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेवर सरकारच्या कामाच्या परिणामाचे एक प्रकारचे रिपोर्ट कार्ड आहे.

अर्थमंत्र्यांनी सादर केले आर्थिक सर्वेक्षणकेंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आज दुपारी 3:45 वाजता मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या मुख्य मुद्द्यांचे तपशील सांगतील. उद्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करतील.

2021-22 साठी GDP वाढीचा अंदाज काय?

2021-22 या आर्थिक वर्षात देशाची वास्तविक जीडीपी वाढ 9.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आरबीआयच्या 9.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा हे थोडे कमी आहे. याशिवाय, आर्थिक वर्ष 2022-23 साठी देशाच्या अर्थव्यवस्थेने 8-8.5 टक्के GDP वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ 3.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रात 11.8 टक्के वाढीचा अंदाज आहे. तर, सेवा क्षेत्राच्या वाढीचा अंदाज 8.2 टक्के आहे.

काय असतं आर्थिक सर्वेक्षण?

चालू आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी राहिली आहे, त्याचा संपूर्ण अहवाल आर्थिक सर्वेक्षणात आहे. आर्थिक सर्वेक्षणात सरकारच्या आगामी आर्थिक वर्षातील आर्थिक विकास दराबाबतच्या धोरणाचा संपूर्ण रोडमॅपही असतो. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राची कामगिरी कशी राहिली आणि ती कशी पुढे राहण्याची अपेक्षा आहे, हेही आर्थिक सर्वेक्षणातच सांगण्यात येते.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्था