शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संपादकीय - आतले आणि बाहेरचे ! कोट्यवधी रुपयांच्या बदल्यात खासदारकी अन् मंत्रीपदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:52 IST

अर्थात या देशात राजकीय नेत्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या रकमांच्या तुलनेत या रकमा म्हणजे ‘किस झाड की पत्ती’!

शंभर कोटी रुपयांच्या बदल्यात राज्यसभेची खासदारकी अथवा राज्यपालपद मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केंद्रीय अन्वेषण संस्थेने सोमवारी केला. काही दिवसांपूर्वीच, अशाच प्रकारे महाराष्ट्रातील काही आमदारांना शंभर कोटी रुपयांच्या मोबदल्यात मंत्रिमंडळात वर्णी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. तिकडे पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांना सक्तवसुली महासंचालनालयाने शनिवारी शिक्षकभरती घोटाळ्याप्रकरणी अटक केली. तत्पूर्वी ईडीने त्यांच्या नजीकच्या एका महिलेकडून तब्बल २१ कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली होती. त्याआधी महाराष्ट्रातील तब्बल पन्नास आमदारांचे राजकीय पर्यटन चांगलेच गाजले. त्यांचा मुंबई-सुरत-गुवाहाटी-गोवा-मुंबई असा चार्टर्ड विमानांनी झालेला प्रवास आणि पंचतारांकित हॉटेल्समधील तब्बल दहा दिवसांचे वास्तव्य, देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. यापैकी शंभर कोटी रुपयांच्या मोबदल्यात खासदारकी, मंत्रिपद अथवा राज्यपालपद मिळवून देण्याच्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात पैशाची देवाणघेवाण झाल्याचे अद्याप समोर आले नसले तरी, चटर्जी यांच्या नजीकच्या महिलेकडे सापडलेली रोख रक्कम आणि आमदारांच्या राजकीय पर्यटनाची जिवंत चित्रीकरणे बघून विस्फारलेले सर्वसामान्य जनतेचे डोळे अद्यापही सामान्य झाले नसावेत! अर्थात या देशात राजकीय नेत्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या रकमांच्या तुलनेत या रकमा म्हणजे ‘किस झाड की पत्ती’!

राजकीय नेते सत्ताकारणाच्या माध्यमातून अफाट कमाई करतात आणि त्यांचे चेलेचपाटे मात्र आयुष्यभर सतरंज्याच उचलत राहतात, अशा आशयाचे विनोद हल्ली समाजमाध्यमांमध्ये खूप फिरत असतात. ती वस्तुस्थिती आहे, हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही माहीत असते. तरीदेखील ते राजकीय नेत्यांच्या कच्छपी लागतात; कारण कधीकाळी आपल्यासारखाच कार्यकर्ता असलेल्या नेत्याने अल्पावधीतच किती अफाट माया गोळा केली, हे त्यांनी याची देही, याची डोळा, बघितलेले असते. नेत्याप्रमाणेच आपलेही नशीब एक दिवस फळफळेल, ही आसच कार्यकर्त्याला सतरंज्या उचलण्याची प्रेरणा देत राहते ! राजकीय नेते सत्तेच्या माध्यमातून माया जमवतात, तर मग आपण का मागे राहायचे, या भावनेतून प्रशासन सेवांमधील उच्च अधिकारीही त्याच वाटेला लागतात. ते करतात तर आपणच कोणते घोडे मारले, म्हणून खालचे अधिकारी व कर्मचारीही मिळेल तिथे चिरीमिरी खातात. नेते आणि अधिकारी लुटतात, तर आपणही करचोरी केल्यास काय बिघडते, या भावनेतून व्यापारी-उद्योजकही शक्य होईल तेवढा कर बुडविण्याचा प्रयत्न करतात.

थोडक्यात काय, तर संधी मिळालेला प्रत्येकजण, जिथे आणि जेवढे शक्य होईल, तेवढे ओरपण्याच्या प्रयत्नात आहे. अर्थात संधी असूनही न ओरपणारे काही सन्माननीय अपवाद आहेत; परंतु हल्ली ते नियम सिद्ध करण्यापुरतेच उरले आहेत ! ओरपण्याचा हा जो सार्वत्रिक रोग या देशात जडला आहे, त्याची फळे भोगावी लागतात, ती ओरपण्याची कोणतीही संधी उपलब्ध नसलेल्या सर्वसामान्यांना! अर्थात, त्यांच्यापैकी बहुतांशजण विंदा करंदीकरांच्या ‘आतले आणि बाहेरचे’ या ललित निबंधातल्याप्रमाणे ‘बाहेरचे’ असतात, तोपर्यंतच या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात बोलत असतात. जेव्हा त्यांना ‘आतले’ होण्याची संधी मिळते, तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग बनण्यात त्यांनाही काही वावगे वाटत नाही. थोडक्यात काय, तर भ्रष्टाचार हाच हल्ली शिष्टाचार झाला आहे! तो संपावा, किमान नगण्य पातळीवर तरी असावा, असे अपवादवगळता कुणालाही वाटत नाही. आपल्यालाही त्या व्यवस्थेचा भाग होण्याची संधी मिळावी, एवढीच बहुतांश जणांची इच्छा असते. या मानसिकतेमुळे देशाचे किती प्रचंड नुकसान होते, याचे कुणालाही काहीही सोयरसुतक नाही! मी आणि माझे कुटुंब यांचे व्यवस्थित चालले म्हणजे झाले, देश खड्ड्यात गेला तरी मला काय त्याचे, ही मानसिकता मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे, ही कटु असली तरी वस्तुस्थिती आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवकाश उरला आहे; पण तब्बल ७५ वर्षांच्या या प्रदीर्घ कालखंडात देशाभिमान, राष्ट्रीयत्व या भावनांचे संवर्धन करण्यात आपण मोठ्या प्रमाणात अपयशी ठरलो आहोत, हेच खरे! आपला देशाभिमान केवळ पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यापुरताच शिल्लक उरला की काय, असे कधी वाटू लागते. स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना तरी या परिस्थितीत फरक होईल, अशी आशा करावी का?

टॅग्स :ministerमंत्रीMumbaiमुंबईMONEYपैसा