शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक वृद्धिदर घसरला; गाठला सहा वर्षांचा नीचांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:11 IST

मॅन्युफॅक्चरिंग, बांधकाम, सेवा, कृषी क्षेत्रातील मंदीचा परिणाम

नवी दिल्ली : आधीच मंदीच्या माऱ्याने रुतण्याच्या स्थितीत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चाकांची गती आणखी मंदावली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील मंदी, कृषी क्षेत्रात झालेली घट, यामुळे भारताचा सकल राष्टÑीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत सहा वर्षांच्या नीचांकापर्यंत खाली उतरला असून, तो ५ टक्के झाला आहे.यापूर्वी २०१२-१३ मध्ये एप्रिल-जूनच्या तिमाहीत ४.९ टक्के एवढा कमी वृद्धिदर नोंदविला गेला होता. २०१८-१९ मध्ये याच तिमाहीत तो ८ टक्के एवढ्या उच्च स्तरावर गेला होता. यावर्षीच्या जानेवारी-मार्चच्या तिमाहीत तो ५.८ टक्के होता.

२०१९-२० मध्ये जीडीपीचा वृद्धीदर ७ टक्क्यांऐवजी ६.९ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने मागील जून महिन्यात व्यक्त केला होता, तसेच एकूण मागणी वाढवून विकासाबाबतची चिंता दूर करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला होता. रिझर्व्ह बँकेने पहिल्या सहामाहीत जीडीपी वृद्धीदर ५.८ ते ६.६ टक्क्यांच्या दरम्यान व दुसºया सहामाहीत ७.३ ते ७.५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.चीनचा आर्थिक वृद्धीदर २०१९ च्या एप्रिल-जून तिमाहीत ६.२ टक्के होता. मागील २७ वर्षांतील तो सर्वांत कमी राहिला.

हा तर मोदीनिर्मित अर्थकंप : कॉंग्रेसचे टीकास्त्रजीडीपीचा वृद्धी दर नीचाकांवर जाणे हा मोदीनिर्मित अर्थकंप असून, देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. सत्य दीर्घ काळपर्यंत झाकले जाऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेची ही दशा जागतिक घटकांमुळे झालेली नाही. भारताची घसरलेली अर्थव्यवस्था आणि वाढणारे घोटाळे, यावर सरकारने श्वेतपत्रिका जारी केली पाहिजे, असे टिष्ट्वट कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव गौडा यांनी केले आहे. मोदी हैै तो मंदी हैै, या हॅशटॅगखाली त्यांनी टिष्ट्वट केले आहे. भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली जीडीपीचा वृद्धी दर घसरणे अपेक्षितच होते, असेही ते म्हणाले.जगात सर्वांत वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था, हे भारताचे बिरूद आता मागे पडले असून, ती आता चीनच्याही मागे पडली आहे. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात जीडीपीचा दर घसरला आहे. कमी ग्राहकी व कमी खाजगी गुंतवणूक हे घटकही जीडीपी वृद्धी दर घसरण्यास कारणीभूत आहेत.मागील पाच तिमाहीतील जीडीपी विकास दरएप्रिल-जून २०१८ ८ टक्केजुलै-सप्टेंबर २०१८ ७ टक्केआॅक्टोबर-डिसेंबर २०१८ ६.६ टक्केजानेवारी-मार्च २०१९ ५.८ टक्केएप्रिल-जून २०१९ ५ टक्के

पहिल्या तिमाहीतील व्यवसायिक क्षेत्रनिहाय विकास दर१) मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा विकास दर ०.६% (मागील वर्षीच्या याच तिमाहीत १२.१% होता)२) कृषी, मत्स्य क्षेत्राचा विकास २% नोंदला गेला. (मागील वर्षीच्या याच तिमाहीत तो ५.१ टक्के होता)३) खाण क्षेत्राचा विकास २.७% झाला. (मागील वर्षीच्या याच तिमाहीत तो ०.४% होता)४) वीज, गॅस व इतर सेवा क्षेत्रांचा विकास ८.६% झाला. (मागील वर्षीच्या याच तिमाहीत ६.७% होता.)५) बांधकाम क्षेत्राचा विकास ५.७% नोंदला गेला. (मागील वर्षी याच तिमाहीत तो ९.६% होता.)६) व्यापार, हॉटेल, वाहतूक, संवाद-सेवा क्षेत्राचा विकास दर ७.१% होता. (मागील वर्षी तो ७.८% होता.)७) वित्त, रिअल इस्टेट व प्रोफेशनल सेवेचा विकास ५.९% नोंदला गेला. (मागील वर्षीच्या तिमाहीत तो ६.५% होता.)८) सार्वजनिक प्रशासन, संरक्षण व इतर सेवांचा विकास ८.५% होता. (मागील वर्षीच्या तिमाहीत तो ७.५% नोंदला गेला होता.)देश लवकरच विकास मार्गावर वेगाने धावू शकेल : देशांतर्गत व जागतिक घटकांच्या परिणामामुळे जीडीपीचा वृद्धिदर घसरला. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, त्यामुळे देश लवकरच विकास मार्गावर वेगाने धावू शकेल.

- के. व्ही. सुब्रह्मण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन