शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खा. विधुरी यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? कारवाईचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 08:37 IST

कारणे दाखवा बजावून इशारा, लोकसभेतून निलंबनही शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे खासदार रमेश विधुरी यांच्याविरुद्ध लवकरच लोकसभा अध्यक्षांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. भाजपनेही विधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून १५ दिवसांत त्यांच्या वक्तव्याबाबत उत्तर मागवले आहे. 

विधुरी यांनी लोकसभेत बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाने लवकरात लवकर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शुक्रवारीही लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी विधुरी यांना कठोर शब्दांत इशारा दिला होता. लोकसभेतील सत्ताधारी पक्षाचे नेते, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनीही ‘एक्स’वर कबीर यांचा ‘ऐसी वाणी बोलिए जो ओरन को सुंदर लगे’ हा दोहा पोस्ट केला आहे.

ही होऊ शकते कारवाईn रमेश विधुरी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काही दिवसांसाठी निलंबित केले जाऊ शकते. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. n भाजपने रमेश विधुरी यांना कारणे नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत त्यांच्याकडून उत्तर मागितले असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास  भाजप त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करील, असे म्हटले आहे.

दानिश अली यांच्या अशोभनीय वर्तनाचीही चौकशी करा : खा. दुबेदानिश अली यांचे अशोभनीय वर्तन आणि टिकाटिप्पणी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप खा. निशिकांत दुबे यांनी शनिवारी लोकसभाध्यक्षांकडे केली. दुबे यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, विधुरी यांच्या भाषणादरम्यान दानिश यांनी अडथळे आणले तसेच पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरून अशोभनीय टिकाटिप्पणी केली. विधुरी यांना चिथावणी देण्यासाठीच हा प्रकार अली यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वर्तनाचीही चौकशी व्हायला हवी. विरोधी पक्षांच्या इतरही काही सदस्यांनी अशोभनीय टिकाटिप्पण्या केल्या. 

काय म्हणाले होते खा. रमेश विधुरी?गुरुवारी लोकसभेतील चर्चेदरम्यान खा. रमेश विधुरी यांनी बसपचे खासदार दानिश अली यांना ‘दहशतवादी’ संबोधल्यानंतर व अपशब्द वापरल्यानंतर त्याची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदार