शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारतात जन्मानंतर केवळ 28 दिवसांमध्ये दगावतात 6 लाख मुले - युनिसेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 16:37 IST

दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या 28 दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या 6 लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली- दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या 28 दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या 6 लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बालमृत्यूबाबत युनिसेफने मंगळवारी अहवाल जाहीर केला. असे असले तरी गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात बालमृत्यूंमध्ये घट झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगातील एकूण 184 देशांची आकडेवारी या अहवालातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताचा या यादीमध्ये 31 वा क्रमांक आहे. भारतात अर्भक मृत्यूचे प्रमाण 25.4 (प्रति 1000 जन्म) असल्याचे त्यात म्हटले आहे.बाळाच्या जगण्याच्या दृष्टीने त्याच्या जन्मानंतरचे पहिले 28 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिल्या महिन्याभरात बाळाचा मृत्यू होण्याची सर्वाधिक शक्यता असते. जगभराच्या सरासरीनुसार जन्मलेल्या प्रत्येक 1000 बाळांमागे 19 बालके दगावतात. संपूर्ण जगाचा विचार केल्यास 2016 साली जन्मल्यावर पहिल्याच आठवड्यात 26 लाख अर्भकांचा मृत्यू झाला. त्यातील 10 लाख बालके जन्माच्या पहिल्याच दिवशी दगावली तर जवळपास दहा लाख बालके जन्मल्यावर एका आठवड्याच्या कालावधीत दगावली. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, या बालकांचा मृत्यू विविध आजारांमुळे, अकाली जन्म, बाळंतपणाच्या वेळेस निर्माण होणार प्रश्न, संसर्ग अशा विविध कारणांमुळे झाला. 0 ते 5 वर्षे या कालावधीत होणाऱ्या मृत्यूमध्ये 1990-2015 या कालावधीत 66 टक्के घट झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सुधारलेल्या आरोग्य सेवा आणि राहणीमान यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे.