शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीदरम्यान 35 हजार बोगस कंपन्यांनी जमा केले 17 हजार कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 22:36 IST

केंद्र सरकारने दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बंद असलेल्या 2 लाख 24 हजार कंपन्यांना ताळे ठोकले आहे. दरम्यान, गतवर्षी घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुमारे 35 हजार कंपन्यांनी बँक खात्यांमध्ये 17 हजार कोटी रुपये जमा केल्याची

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बंद असलेल्या 2 लाख 24 हजार कंपन्यांना ताळे ठोकले आहे. दरम्यान, गतवर्षी घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुमारे 35 हजार कंपन्यांनी बँक खात्यांमध्ये 17 हजार कोटी रुपये जमा केल्याची माहिती समोर आली आहे. हे पैसे नंतर या खात्यांमधून काढून घेण्यात आले होते.  कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून रविवारी ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार बंद करण्यात आलेल्या 2 लाख 24 हजार कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या या बोगस (शेल) कंपन्या होत्या. 56 बँकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सरकारने या कंपन्यांविरोधात कारवाई केली आहे. बँकांनी सरकारला 35 हजार कंपन्या आणि 58 हजार बँक खात्यांची माहिती दिली होती.  या कंपन्यांविरोधातील प्राथमिक चौकशीमध्ये नोटाबंदी दरम्यान या 35 हजार कंपन्यांनी 17 हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा केले होते. त्यानंतर हे पैसे काढून घेण्यात आल्याचे समोर आले. मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एका कंपनीच्या 2 हजार 134 खात्यांची माहिती मिळाली आहे. तर  निगेटिव्ह ओपनिंग बॅलन्स असलेल्या एका कंपनीने नोटाबंदीच्या काळात 2 हजार 484 कोटी रुपये बँकामध्ये जमा केले आणि नंतर काढून घेतल्याचेही उघड झाले होते.  अशा कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांची खाती गोठवण्यात आली आहेत. सरकारच्या परवानगीशिवाय या कंपन्या आपली मालमत्ता विकू किंवा हस्तांतरीत करू शकणार नाहीत. तसेच केंद्राकडून राज्य सरकारांनाही अशा व्यवहारांची नोंदणी स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सरकारने दिली.  कंपनी व्यवहार मंत्रालयाने गेल्या तीन आर्थिक वर्षांपासून आर्थिक विवरण सादर न करणाऱ्या 3.09 लाख कंपनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना अयोग्य घोषित केले होते. कंपनी कायदा. 2013 नुसार वित्तीय विवरण सादर करणे अनिवार्य आहे. प्राथमिक तपासामध्ये अयोग्य घोषित करण्यात आलेले डायरेक्टर्समधील 3 हजार डायरेक्टर्स 20 हून अधिक कंपन्यांचे डायरेक्टर असल्याचे समोर आले होते. जे कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक होते.  

टॅग्स :Note Banनोटाबंदीblack moneyब्लॅक मनी