शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 09:09 IST

Dular Chand Yadav murder case: एकेकाळचे लालूप्रसाद यादव यांचे कट्टर समर्थक आणि सध्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असलेले नेते दुलारचंद यादव यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी मोकामा मतदारसंघातील जेडीयूचे उमेदवार आणि बाहुबली नेते अनंत सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान, एकेकाळचे लालूप्रसाद यादव यांचे कट्टर समर्थक आणि सध्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असलेले नेते दुलारचंद यादव यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी मोकामा मतदारसंघातील जेडीयूचे उमेदवार आणि बाहुबली नेते अनंत सिंह यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यादरम्यान, रात्रपरभ पाटण्यापासून बाढपर्यंत आणि बाढपासून पाटण्यापर्यंत पोलिसांच्या वेगवान हालचाली सुरू होत्या.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाटणा पोलिसांची टीम मोकाामामधील दुलारचंद यादव यांच्या  हत्येचा तपास करत होती. दरम्यान, रात्री ११ वाजून १० मिनिटांनी एसएसपी कार्तिकेय शर्मा हे बाढ येथील कारगिल मार्केटमध्ये पोहोचले. तिथे अनंत सिंह हे त्यांच्या समर्थकांसमवेत उपस्थित होते. त्यांनी तिथे अनंत सिंह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी अनंत सिंह यांना ताब्यात घेऊन पोलिसांचं पथक बाढ येथून रवाना झालं. या हत्येप्रकरणी अनंत सिंह यांच्यासह मणिकांत ठाकूर आणि रंजित राम  यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

अनंत सिंह यांना ताब्यात घेऊन पाटणा येथे येत असलेल्या पोलिसांच्या पथकाला पाटणा येथे पोहोचण्यास उशीर झाला. अखेरीस रात्री १.४५ वाजता पोलिसांच पथं अनंत सिंह यांना घेऊन पाटणा येथे दाखल झालं. त्यानंतर रात्री २ वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देण्यात आली. एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देत अनंत सिंह यांच्या अटकेला दुजोरा दिला.

मोकामा येथील दुलारचंद यादव यांच्या हत्ये प्रकरणी पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, हत्या झालेले दुलारचंद यादव हेसुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. तसेच ही घटना घडली तेव्हा आचारसंहितेचं उल्लंघन झालं होतं. या हत्ये प्रकरणी अनंत सिंह, मणिकांत ठाकूर आणि रंजित राम यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. तसेच व्हिडीयो फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Biharबिहार