शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिममध्ये वर्कआऊट करताना वाद, तरुणीला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 12:53 IST

मध्यप्रदेशची आर्थिक राजधानी इंदूर येथील एका जिममध्ये तरुणीला लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देतरुणीने तक्रार केल्याचे समजल्यानंतर या तरुणाचा संताप अनावर झाला.जिममध्ये उपस्थित असलेल्या काही जणांनीमध्ये हस्तक्षेप करुन ही मारहाण थांबवली.

इंदूर, दि. 19 - मध्यप्रदेशची आर्थिक राजधानी इंदूर येथील एका जिममध्ये तरुणीला लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहताना मारहाण करणा-या तरुणाची अमानुषता दिसून येते. पीडित तरुणी जिममध्ये व्यायाम करत असताना तिचा तिथेच व्यायाम करणा-या एका तरुणाबरोबर वाद झाला. हा तरुण युवतीच्या व्यायामामध्ये अडचणी निर्माण करत होता. त्यामुळे अखेर कंटाळून या तरुणीने प्रशिक्षकाकडे तक्रार केली. 

तरुणीने तक्रार केल्याचे समजल्यानंतर या तरुणाचा संताप अनावर झाला. त्याने सरळ या तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जिममध्ये उपस्थित असलेल्या काही जणांनीमध्ये हस्तक्षेप करुन ही मारहाण थांबवली. मारहाणीत तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे.  आरोपी तरुणाविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आमचा तपास सुरु आहे असे डीएसपी शशिकांत कानकाने यांनी सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार जिममध्ये कॉलेजच्या सात तरुणांचा एक ग्रुप वर्कआउट करण्यासाठी येतो. यात चार तरुणी आणि तीन युवक आहेत. या ग्रुपमधील एक तरुणी आणि एका तरुणामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. गुरुवारी संध्याकाळी तरुणी वर्कआऊट करत असताना तरुण तिला त्रास देत होता. जेव्हा तरुणीने या प्रकाराची तक्रार केली तेव्हा संतापलेल्या तरुणाने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे इंदूरच्या या जिममध्ये व्यायामासाठी येणा-या महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जिममध्ये सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे संचालकाने सांगितले. मग तरीही मग तरुणीला कशी मारहाण झाली ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मारहाण केल्यानंतर तरुण तिथून फरार झाला. पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी भंवरकुआ स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. 

दिल्लीतही महिलेचा विनयभंगदिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक जबरदस्तीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पीडित महिलेने तक्रार केली म्हणून तिलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आले.