शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल फोटोमुळे हिसारच्या राजकारणात मोठी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:09 IST

मतदानाच्या एक दिवशी आधी कुलदीप बिश्नोई यांच्यासोबत सुनैना चौटाला यांचा फोटो व्हायरल

बलवंत तक्षक -

चंडीगड : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे हिसारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हरयाणाच्या राजकारणातील दोन मोठे दिग्गज देवीलाल आणि भजनलाल हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत, पण यावेळी हिसार मतदारसंघातील इंडियन नॅशनल लोक दलाच्या उमेदवार सुनैना चौटाला यांनी भजनलाल यांचा मुलगा कुलदीप  यांची भेट घेऊन मते मागितली आहेत.

- सुनैना चौटाला कुलदीप बिश्नोईंच्या घरी जवळपास तासभर थांबल्या होत्या. या फोटोच्या माध्यमातून बिश्नोई यांनी समर्थकांना सुनैना यांच्या बाजूने मतदान करण्याचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

तिकिटाचे दावेदारसुनैना या माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांची नात आहेत. बिश्नोई हे हिसार मतदारसंघातून भाजपच्या तिकिटाचे दावेदार होते; परंतु पक्षाने ऊर्जामंत्री रणजित सिंह चौटाला यांना तिकीट दिले. तिकीट मिळाल्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामाही दिला होता.

तिकीट न मिळाल्याने नाराजीहिसारमधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने कुलदीप बिश्नोई आणि त्यांचा आमदार मुलगा भव्य बिश्नोई यांना सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान बिश्नोई यांनी कधीही उघडपणे भाजप उमेदवार रणजित सिंह यांची बाजू घेतली नाही. आता इनेलो उमेदवार सुनैना यांच्यासोबतचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. याबाबत बिष्णोई यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, निवडणुकीदरम्यान कोणताही उमेदवार घरी जाऊन मतांची मागणी करू शकतो.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Haryanaहरयाणा