शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

...'या' कारणांमुळे चीनला भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या एकत्र येण्यापासून धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:40 IST

मनिला येथे सुरु असलेल्या एशियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्देआपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना  आहे. या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे.

नवी दिल्ली - मनिला येथे सुरु असलेल्या एशियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक होणार आहे. या बैठकीमुळे चीन चिंतेत असून, संबंधित देशांनी सर्व समावेशकचा मार्ग अनुसरावा. कुठल्या तिस-या पक्षाला वगळू नये असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. चारही देशांच्या मैत्रीपूर्ण सहकार्याचे आम्ही स्वागत करतो पण तिस-या पक्षाला टार्गेट करु नये असे चीनने म्हटले आहे. 

आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना  आहे.  भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीतून कुणाच्याही हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मागच्या आठवडयात व्यक्त केली होती. 

- राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास चार देशांनी एकत्र येणे हा चीनसाठी एकप्रकारचा धोकाच आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे लोकशाही प्रधान देश आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचीच सत्ता चालते. 

- हे चार देश लष्करी दृष्टया एकत्र आल्यास इंडो-पॅसिफिक प्रदेशात खेळाचे सर्व नियमच बदलून जातील. जगातील एकमेव सुपरपॉवर अमेरिका या देशांसोबत  आहे. 

- या चार देशांबरोबरच्या व्यावसायिक, व्यापारी संबंधांमध्ये चीनचा जास्त फायदा आहे. हे चारही देश एकत्रितपणे व्यापार संतुलन साधण्यासाठी चीनवर दबाव आणू शकतात. 

- हे चारही देश चीनच्या वन बेल्ट वन रोड धोरणासमोर आव्हान निर्माण करु शकतात. वन बेल्ट, वन रोड ही शी जिनपिंग यांचे महत्वकांक्षी योजना आहे.   

टॅग्स :chinaचीन