शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

निंद न आए, चैन न आए... सिद्धरामय्यांनी उडवलीय कुमारस्वामींची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 16:55 IST

कर्नाटक सरकारमधील नेत्यांमधील दरी पुन्हा एकदा समोर आली असून, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या पत्रप्रपंचामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी त्रस्त झाले आहेत.

बंगळुरू - भाजपाला हुलकावणी देत कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या जेडी (एस) आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून सारे काही आलबेल नसल्याचे वृत्त येत होते.  काही दिवसांपूर्वीच आघाडी सरकारमधील अडचणींचा पाढा वाचत कुमारस्वामी भावूक झाल्याचेही साऱ्यांनी पाहिले होते. आता कर्नाटक सरकारमधील नेत्यांमधील दरी पुन्हा एकदा समोर आली असून, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या पत्रप्रपंचामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी त्रस्त झाले आहेत. सिद्धारामय्या यांच्या या पत्रांमुळे  कुमारस्वामी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या माजी मुख्यमंत्री धरमसिंह यांच्याविरोधातील  लेटर वॉरच्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या आहेत. कुमारस्वामी यांच्या जेडी (एस) काँग्रेस आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून सिद्धारामय्या यांनी कुमारस्वामी आणि त्यांच्या मंत्र्यांना समस्यांचा पाढा वाचणारी पत्रे पाठवण्याचा धडाका लावला आहे. सिद्धारामय्यांनी कुमारस्वामी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना 9 पत्रे पाठवली आहेत. यापैकी बहुतांश पत्रांमध्ये सिद्धारामय्या यांनी त्यांच्या बदामी या मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला आहे. तसेच खनिज तेलावरील कर वाढवण्याच्या तसेच पीडीएस-बीपीएल कुटुंबीयांसाठी देण्यात येणाऱ्या तांदळाच्या पुरवठ्यात घट करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी सिद्धारामय्या यांनी केली आहे. सिद्धारामय्या यांच्या या पत्रांमुळे  कुमारस्वामी चांगलेच त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आघाडी सरकार चालवतानाच्या अडचणींचा पाढा वाचला होता. दरम्यान, कुमारस्वामी यांना डिवचण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी सिद्धारामय्या हा पत्रप्रपंच करत असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याkumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण