चिकनमुळे कमी होतेय रोगप्रतिकारक शक्ती

By Admin | Published: July 31, 2014 11:52 AM2014-07-31T11:52:37+5:302014-07-31T11:52:46+5:30

कोंबड्यांची लवकर वाढ व्हावी यासाठी त्यांना अँटिबायोटीक दिले जात असल्याचे उघड झाले असून यामुळे चिकन खाणा-यांची रोगप्रतिकारक शक्तीही घटत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Due to chicken low immunity | चिकनमुळे कमी होतेय रोगप्रतिकारक शक्ती

चिकनमुळे कमी होतेय रोगप्रतिकारक शक्ती

googlenewsNext
>ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. ३१ - आजारी पडल्यावर औषध घेऊनही ब-याचदा काहीच सुधारणा होत नसल्याची तक्रार अनेकजण करत असतात. औषधांना निष्प्रभ करण्यासाठी चिकनही कारणीभूत ठरु शकते अशी माहिती एका पाहणीतून उघडकीस आली आहे. कोंबड्यांची लवकर वाढ व्हावी यासाठी त्यांना अँटिबायोटीक दिले जात असल्याचे उघड झाले असून यामुळे चिकन खाणा-यांची रोगप्रतिकारक शक्तीही घटत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
सेंटर फॉर सायन्स अँड एन्वायरमेंट (सीएसई) या अग्रगण्य संस्थेने दिल्लीतील चिकनच्या खालावलेल्या दर्जाविषयी सर्वेक्षण केले आहे. संस्थेने दिल्ली व परिसरातून चिकनचे ७० नमूने जमा केले. यातील ४० टक्के नमून्यांमध्ये अँटीबायोटीक्स आढळून आले आहे. तर १७ टक्के नमून्यांमध्ये एका पेक्षा अधिक प्रकाराचे अँटीबायोटीक्स आढळले.  असे चिकन खाणा-या व्यक्तीने आजारपणात अँटीबायोटीक औषध घेतल्यास ते औषध निष्प्रभ ठरते असे संस्थेने म्हटले आहे. 
पोल्ट्री (कुक्कुट पालन) उद्योगात सिप्रोफ्लोक्सेक्सिन यासारख्या अँटीबायोटीक्सचे बेधडकपणे वापर केले जात असल्याचे संस्थेने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. या औषधांचा वापर आजारी माणसांवर केला जात असून त्यामुळे आजारावर मात करता येते. मात्र कोंबड्यांना असे औषध दिल्याने कोंबड्यांची झटपट वाढ होते तसेच त्यांचे वजनही वाढते. असे चिकन खाणा-या व्यक्तीवर अँटीबायोटीक औषधं काम करणार नाहीत व त्यामुळे आजारपण जीवावरही बेतू शकते असे संस्थेने अहवालात म्हटले आहे. यावर लगाम घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे अपेक्षीत असून पोल्ट्री फार्ममध्ये अँटीबायोटीक्सचा वापर करण्यावर बंदीच घालावी अशी मागणीही सीएसआयने केली आहे. 

Web Title: Due to chicken low immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.