कर्नाटक पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक अधिकारी तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेला बाथरुममध्ये घेऊन गेल्याचा दिसत आहे. या प्रकरणी आता कर्नाटक सरकारने शुक्रवारी तुमकुरु जिल्ह्यातील मधुगिरीचे पोलीस उपअधीक्षक (DSP) बी रामचंद्रप्पा यांना निलंबित केले. त्या अधिकाऱ्याने ऑफिसच्या बाथरूममध्ये एका महिलेसोबत अयोग्य वर्तन करताना दिसत आहे.
गुरुवारी रात्रीपासून सोशल मीडियावर ३५ सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, यामध्ये पोलीस अधिकारी रामचंद्रप्पा बाथरूममध्ये महिलेसमोर उभे असल्याचे दिसत आहे. तुमकुरुचे एसपी अशोक केव्ही यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून योग्य कारवाई करू.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, “एसपींनी घटनेचा अहवाल पोलिस महानिरीक्षकांना सादर केला आहे. आयजीपींनी तो पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक आलोक मोहन यांना पाठवला आहे. रामचंद्रप्पा यांना शुक्रवारी संध्याकाळी निलंबित करण्यात आले.
धुक्यामुळे अपघातग्रस्त झालेली कार पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना ट्रकने चिरडले, ४ जणांचा मृत्यू
ही महिला गुरुवारी काही जणांसह मधुगिरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्याचे तपासात समोर आले आहे. बाकीचे तपास अधिकाऱ्यांशी बोलत होते. रामचंद्रप्पाने त्या महिलेशी बोलत बोलत ओळख वाढवली आणि त्या महिलेला बाजूला घेऊन गेले. यानंतर दोघेही पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या कोपऱ्याकडे जाताना दिसले. त्या कोपऱ्याच्या शेवटी एक बाथरुम आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, "पोलीस आधिकारी महिलेला घेऊन बाथरूममध्ये गेला आणि अश्लील कृत्य केले. यावेळी कोणीतरी मोबाईल बाथरूमच्या खिडकीवर ठेवला आणि व्हिडीओ रेकॉर्ड केला. मात्र, ३५ सेकंदांनंतर रेकॉर्डिंग थांबले. त्यानंतर महिलेने रेकॉर्डिंग पाहून ती महिला पोलीस रामचंद्रप्पाच्या मागे लपल्याचे दिसत आहे.