शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Dry Day List 2023: 'ड्राय डे'ची यादी जाहीर! २०२३ मध्ये एकूण २२ दिवस बंद राहणार दारुची दुकानं, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:56 IST

नववर्ष स्वागताची यंदा जय्यत तयारी केली जात आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनवर बंधनं आली होती.

नवी दिल्ली-

नववर्ष स्वागताची यंदा जय्यत तयारी केली जात आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनवर बंधनं आली होती. पण यंदा कोणतीही बंधनं नाहीत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर देशात मद्याची विक्री प्रचंड वाढते. पण देशात असे अनेक दिवस असतात की ज्या दिवशी मद्य विक्रीला पूर्णपणे बंदी असते. या दिवसांना 'ड्राय डे' असं म्हटलं जातं. आता २०२३ या वर्षातील 'ड्राय डे'ची यादी समोर आली आहे. 

भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रमुख राष्ट्रीय सणांना आणि प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्ट) आणि गांधी जयंती (२ ऑक्टोबर) रोजी ड्राय डे घोषीत असतो. याशिवाय आणखी कोणकोणत्या दिवशी नववर्षात ड्राय डे असणार आहे हे जाणून घेऊयात. 

२०२३ सालच्या 'ड्राय डे'ची यादी पुढील प्रमाणे...

  • १४ जानेवारी- मकर संक्रांत (काही राज्यांमध्ये)
  • २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन (संपूर्ण देशात ड्राय डे)
  • ३० जानेवारी- महात्मा गांधी पुण्यतिथी (संपूर्ण देशात)
  • ८ मार्च- होळी (काही राज्यात)
  • ३० मार्च- रामनवमी (काही राज्यांत)
  • ४ एप्रिल- महावीर जयंती (काही राज्यांत)
  • ७ एप्रिल- गुड फ्रायडे 
  • १४ एप्रिल- आंबेडकर जयंती
  • २२ एप्रिल- ईद उल-फितर
  • २९ जून- आषाढी एकादशी (काही राज्यांमध्ये)
  • ३ जुलै- गुरुपौर्णिमा (काही राज्यांमध्ये)
  • २९ जुलै- मोहरम 
  • १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन (संपूर्ण देशात)
  • ६ सप्टेंबर- जन्माष्टमी (काही राज्यांमध्ये)
  • १९ सप्टेंबर- गणेश चतुर्थी (काही राज्यांमध्ये)
  • २८ सप्टेंबर- अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद (काही राज्यांमध्ये)
  • २ ऑक्टोबर- गांधी जयंती (संपूर्ण देशात)
  • २४ ऑक्टोबर- दसरा (काही राज्यांमध्ये)
  • २८ ऑक्टोबर- महर्षी वाल्मिकी जयंती
  • १२ नोव्हेंबर- दिवाळी (संपूर्ण देशात)
  • २७ नोव्हेंबर- गुरुपर्व (काही राज्यांमध्ये)
  • २५ डिसेंबर- ख्रिसमस 

'ड्राय डे'च्या या तारखांसोबतच वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सण आणि जयंतीनुसार 'ड्राय डे' जाहीर केला जातो. ज्या शहरात 'ड्राय डे' असतो तिथं मद्यविक्रीची दुकानं बंद ठेवण्यात येतात. याशिवाय ज्या ठिकाणी निवडणूक मतदान असते त्याठिकाणीही मतदानाच्या ४८ तास आधीपासूनच मद्याच्या विक्रीवर बंदी असते. 

देशात बिहार आणि गुजरात सारखी राज्य 'ड्राय स्टेट' आहेत. जिथं मद्यविक्रीवर बंदी आहे. देशातील विविध ठिकाणच्या सुट्ट्यांनुसार काही खास दिवशी ड्राय डे जाहीर केले जातात.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा