शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी, तरी बिहारमध्ये डॉक्टरांची दारूपार्टी; रुग्णालयाच्या गेस्ट हाउसमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:08 IST

- एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : बिहारच्या दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या गेस्ट हाउसमध्ये दारू पार्टी ...

- एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारच्या दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या गेस्ट हाउसमध्ये दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका कॉन्फरन्ससाठी शहर व इतर ठिकाणांहून आलेल्या डॉक्टरांनी ही पार्टी केल्याचे उघड झाले आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या संदर्भात दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य के. एन. मिश्रा यांना विचारले असता, त्यांनी अशा प्रकारची पार्टी झाल्याचा इन्कार केला. व्हिडीओ करणाऱ्याने खोक्यातून दारूच्या बाटल्या काढल्याचे स्पष्ट दिसते. याचा अर्थ तोपर्यंत त्या बाटल्या खोक्यातच होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे.या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची दरभंगाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अवकाश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

विदेशी दारूच्या तीन बाटल्या जप्त या प्रकरणात पुढील कारवाई करण्याची जबाबदारी त्यांनी एसडीपीओ अमितकुमार यांच्याकडे सोपवली आहे. त्यांनी तातडीने गेस्ट हाउस व रेस्टॉरंटमध्ये जाऊन झडती घेतली. यावेळी गेस्ट हाउसच्या १०२ क्रमांकाच्या खोलीमध्ये विदेशी दारूच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या तिन्ही बाटल्या महागड्या असल्याचे सांगितले जाते. या प्रकारानंतर पोलिसांनी प्रत्येक खोलीची झडती घेतली. त्याचबरोबर दारू पार्टीत सामील असलेल्या डॉक्टरांचाही शोध घेतला जात आहे. 

राजकारण तापले डॉक्टरांच्या दारू पार्टीचा व्हिडीओ पुढे आल्यानंतर बिहारमध्ये राजकारण तापले आहे.  भाजप व हम पक्षाने दारू पार्टीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.  केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद यांनी म्हटले आहे की, बिहारचे पोलिस दारू विक्रीचे काम करवून घेत आहेत.  जापचे प्रमुख पप्पू यादव यांनी म्हटले आहे की, या प्रकाराने बिहारमधील दारूबंदीची पोलखोल झाली आहे. राज्यात गरिबांसाठी व डीएमसीएचचे प्राचार्य व डॉक्टरांसाठी दारूबंदीचा वेगळा कायदा आहे का? हे डॉक्टर दारू पार्टी करीत असताना प्रशासन झोपले होते का? मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याची दखल घ्यावी.

टॅग्स :liquor banदारूबंदी