शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह गंभीर गैरवर्तन : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 08:24 IST

चालकाचा मृत्यू झाल्यामुळे बडतर्फी सक्तीच्या निवृत्तीत बदलली

खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : दारू पिऊन वाहन चालविण्याची परवानगी कोणालाही नाही. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आणि इतरांच्या जीवाशी खेळणे हे अत्यंत गंभीर गैरवर्तन आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.ब्रिजेश चंद्र द्विवेदी हे फतेहपूर येथे प्रोव्हिन्शिअल आर्म्ड कॉन्स्टब्लरीमध्ये (पीएसी) चालक होते. दि. २ फेब्रुवारी २००० रोजी ते कुंभमेळ्यासाठी फतेहपूरहून अलाहाबादला पीएसी जवानांना घेऊन जाणारा लष्करी ट्रक चालवत होते. यावेळी त्यांनी मागच्या बाजूने एका जीपला धडक दिली. वैद्यकीय तपासणीत त्यांनी दारूचे सेवन केले होते व दारुच्या प्रभावाखाली असल्याचे आढळले. त्यांची विभागीय चौकशी करण्यात येऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

या बडतर्फीला उच्च न्यायालयात ब्रिजेश चंद्र द्विवेदी यांनी आव्हान दिले. तेव्हा असा युक्तिवाद केला की, बडतर्फीची शिक्षा गुन्ह्यापेक्षा खूप जास्त आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. दरम्यान,  ब्रिजेश चंद्र यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोठे नुकसान झाले नसून, हा किरकोळ अपघात होता म्हणून थोडी उदारता दाखवावी. बडतर्फीच्या आदेशाचे सक्तीच्या निवृत्तीमध्ये रूपांतर व्हावे, अशी प्रार्थना ब्रिजेश चंद्र यांच्यातर्फे करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दारू पिऊन ट्रक चालवला हे सिद्ध झाले आहे. दारूच्या नशेत पीएसी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा ट्रक चालविणे हे अतिशय गंभीर गैरवर्तन आहे. अशी अनुशासनहिनता खपवून घेतली जाऊ शकत नाही आणि तीही शिस्तबद्ध लष्करात, असे मत नोंदवले. 

जीवघेणा अपघात झाला नाही हे नशीब

 केवळ मोठे नुकसान झाले नसल्यामुळे आणि तो किरकोळ अपघात होता हे कारण असू शकत नाही. जीवघेणा अपघात झाला नाही हे नशीब. ट्रकमधून प्रवास करणाऱ्या पीएसी कर्मचाऱ्यांचा जीव ड्रायव्हरच्या हाती होता. त्याने त्यांच्या जीवाशी खेळ केला असे म्हणता येईल, असे निरीक्षण नोंदवले. ब्रिजेश चंद्र यांचा मृत्यू झाला असल्यामुळे बडतर्फीची शिक्षा सक्तीच्या निवृत्तीमध्ये बदलली जावी.न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि बी. व्ही. नागरथना, सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह