शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 07:14 IST

गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी १३ मार्च रोजी एक मोहीम राबविण्यात आली होती.

नवी दिल्ली : इम्फाळ आणि गुवाहाटी भागात ८८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, चार तस्करांना जेरबंद करण्यात आले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी म्हटले आहे.

शाह यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, अमली पदार्थांच्या तस्करांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. मोदी सरकारच्या अमली पदार्थमुक्त भारत निर्माण अभियानाला गती देताना ८८ कोटी रुपयांच्या मेथमफेटामाईन गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तस्करांच्या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी १३ मार्च रोजी एक मोहीम राबविण्यात आली होती. एनसीबी पथकाने लिलोंग भागाजवळ एक वाहन रोखून तपासणी केली असता, टूल बॉक्समधून १०२.३९ किलो मेथमफेटामाईच्या गोळ्या जप्त केल्या. यावेळी ट्रकमधील दोन जणांना जेरबंद केले. 

एनसीबी पथकाचे केले अभिनंदनया अमली पदार्थांचा स्रोत मणिपूरच्या मोरेह शहरात आहे. या प्रकरणात अडकलेल्या इतरांना पकडण्यासाठी तपास सुरू आहे.

दरम्यान, अन्य एका निवेदनानुसार, त्याच दिवशी अन्य एका कारवाईत सिल्चरजवळ आसाम-मिझोराम सीमेवर एका एसयूव्हीची तपासणी केली असता, अतिरिक्त टायरमध्ये लपविलेल्या ७.४८ किलो मेथमफेटामाईनच्या गोळ्या जप्त केल्या.

पथकाने तातडीने कारवाई करीत तस्करीसाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहन जप्त केले व नंतर संबंधितांना अटक केली. या कारवाईसाठी गृहमंत्र्यांनी एनसीबी पथकाचे अभिनंदन केले आहे.

ईशान्य भाग संवेदनशीलईशान्येकडील भागात अमली पदार्थांच्या विरोधात मोठी मोहीम वेळोवेळी राबविण्यात येत आहे. या तस्करीचे आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय संबंधही शोधून काढण्यात येत आहेत. ईशान्येकडील भाग भौगोलिक स्थितीमुळे अमली पदार्थांच्या तस्करीसाठी भारताच्या सर्वांत संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहDrugsअमली पदार्थ