शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

महाकुंभमेळ्यासाठी 100 मीटर पाण्याखालीही ड्रोन; अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेमुळे जग होणार थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 10:04 IST

१३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रथमच संगम क्षेत्रात पाण्याखाली ड्रोन तैनात केले जाणार आहेत.

महाकुंभनगरी : उत्तर प्रदेश सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित होणाऱ्या प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. याअंतर्गत १०० मीटर पाण्याखाली आणि जमिनीपासून १२० मीटर उंचीवर देखरेख करणारे ड्रोन तैनात करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भव्य सोहळ्यात ४५ कोटींहून अधिक तीर्थयात्री सहभागी होण्याची शक्यता आहे.

१३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रथमच संगम क्षेत्रात पाण्याखाली ड्रोन तैनात केले जाणार आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही झाला वापर यावर्षी अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रथमच वापरल्या गेलेल्या ड्रोन विरोधी प्रणालीचा उपयोग महाकुंभमेळ्यातही केला जाणार आहे.संगम स्नानादरम्यान प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा करण्यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याखाली कार्यरत असलेले हे ड्रोन २४ तास देखरेख करतील आणि कमी प्रकाशातही कार्यक्षम असतील. याशिवाय ‘टेथर्ड ड्रोन’ हवाई क्षेत्राचे संरक्षण करतील.

१०० मीटर खोलीवर कार्यरत असलेले हे अत्याधुनिक ड्रोन कोणत्याही परिस्थितीत अचूक माहिती देण्यास सक्षम आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

ड्रोन पाण्यात फिरत राहणार अन्...प्रयागराजचे पोलिस महानिरीक्षक (पूर्व क्षेत्र) राजीव नारायण मिश्रा यांनी उच्च गतीने कार्य करणाऱ्या पाण्याखालील ड्रोनसाठी नुकतीच चाचणी घेतली. हे अत्याधुनिक ड्रोन १०० मीटरपर्यंत पाण्यात फिरू शकतात आणि तत्काळ रिपोर्ट पाठवू शकतात. या ड्रोनला कोठूनही नियंत्रित करता येते आणि पाण्याखाली संशयास्पद हालचालींचे अचूक निरीक्षण यामुळे होऊन तातडीने कारवाई करता येईल, असे ते म्हणाले.

७००हून अधिक बोटी पाण्यावर नजर ठेवण्यासाठी पीएसी (प्रांतीय सशस्त्र पोलिस), एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल), एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) यांच्या कर्मचाऱ्यांसह ७००हून अधिक बोटी तैनात राहणार आहेत. सुरक्षेसाठी रिमोट-नियंत्रित ‘लाइफबॉय’ (सुरक्षा यंत्र) उपकरणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

‘एआय’द्वारे गर्दीचा अंदाज- ड्रोनशिवाय, एआय-सक्षम कॅमेरे गर्दीचे विश्लेषण करतील, गर्दीचा अंदाज लावतील आणि उपस्थितांची संख्या तातडीने मोजतील.- चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान सुरक्षा अधिक मजबूत करेल. महाकुंभमेळ्यासाठी उभारलेल्या या अत्याधुनिक व्यवस्थेमुळे जगभरात एक नवा आदर्श प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hinduहिंदू