शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोनने हेरगिरीचा पाकचा प्रयत्न हाणून पाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:54 IST

पाच अतिरेक्यांचा खात्मा, एका जवानाला वीरमरण

ठळक मुद्देइस्लामाबाद येथील भारतीय राजदूतावासामध्ये ड्रोन आढळल्याने सुरक्षा नियमांचा भंग झाल्याचा आक्षेप भारताने पाकिस्तानकडे नोंदविला आहे

नवी दिल्ली/इस्लामाबाद : जम्मू सीमेजवळ जबोवाल येथे शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी ड्रोनचा भारतीय हद्दीत हेरगिरी करण्याचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी गोळीबार करून हाणून पाडला. तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भारतीय राजदूतावास व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांपाशी एक ड्रोन हेरगिरी करत असल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर दिल्लीतील पाकिस्तानच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यास बोलावून भारताने चांगली समज दिली आहे.काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये हवाई दलाच्या केंद्रावर सीमेपलीकडून पाठविण्यात आलेल्या ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला करण्यात आला होता. त्यानंतरही जम्मूमध्ये ड्रोन विमाने दिसली होती.

इस्लामाबाद येथील भारतीय राजदूतावासामध्ये ड्रोन आढळल्याने सुरक्षा नियमांचा भंग झाल्याचा आक्षेप भारताने पाकिस्तानकडे नोंदविला आहे. जम्मू सीमेवरील जबोवाल या गावी शुक्रवारी पहाटे ४ वाजता जवानांना एक पाकिस्तानी ड्रोन दिसले. ते भारतीय हद्दीत हेरगिरीसाठी घुसखोरी करू पाहत होते. 

अद्ययावत प्रणाली बसविणे आवश्यकजम्मूतील हवाई दलाच्या केंद्रावर बॉम्बहल्ला करण्यासाठी सीमा ओलांडून दोन ड्रोन भारतीय हद्दीत आले; पण त्याचा रडार यंत्रणेला सुगावाही लागला नव्हता. त्यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी सीमेवर सर्वच लष्करी तळांवर अद्ययावत प्रणाली कार्यान्वित करणे आवश्यक बनले आहे.

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर चकमकीत ठारश्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए- तोयबाचे पाच अतिरेकी ठार झाले. तर सैन्याचा एक जवान शहीद झाला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, मारलेल्या अतिरेक्यांचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी होता. यातील एक निशाज लोन ऊर्फ खिताब हा संघटनेचा जिल्हा कमांडर होता, तर अन्य एक पाकिस्तानचा होता. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

टॅग्स :delhiदिल्लीIndian Armyभारतीय जवान