शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लायसन्समुळे ९ देशांत चालवता येते वाहन; अमेरिकेसह फ्रान्स, इंग्लंडचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 02:29 IST

अनेकदा आपल्याकडे ड्रायव्हिंगचे लायसन्स असते; पण परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते, असे आपणास सांगण्यात येते; पण भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे तुम्ही जगातील तब्बल ९ देशांमध्ये तीन महिने ते एक वर्षापर्यंत वाहन चालवू शकता.

नवी दिल्ली : अनेकदा आपल्याकडे ड्रायव्हिंगचे लायसन्स असते; पण परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते, असे आपणास सांगण्यात येते; पण भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे तुम्ही जगातील तब्बल ९ देशांमध्ये तीन महिने ते एक वर्षापर्यंत वाहन चालवू शकता. अर्थात अनेक देशांत वाहने उजवीकडून चालवतात, तर आपल्याकडे डाव्या बाजूने. त्यामुळे ही नवी शिस्त तिथे शिकावीच लागते.अनेक देशांत वाहने भाड्याने मिळतात. त्यापैकी ९ देशांत तुमच्याकडे लायसन्स असल्यास तुम्ही वाहन भाड्याने घेऊ न त्या देशाच्या कोणत्याही भागात ते चालवू शकतात. अगदी अमेरिकेतही तुम्हाला एक वर्ष वाहन चालवण्यासाठी परवानगी आहे; पण अट एकच, तुमचे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीतील असायला हवे. शिवाय ते लायसन्स असले तरी तुम्हाला आय-९४ फॉर्म सोबत ठेवावा लागतो. त्यावर तुम्ही अमेरिकेत कधी आलात, याचा उल्लेख असतो. अर्थात या सर्व ९ देशांत केवळ इंग्रजीतील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालते. त्यावर तुमचे छायाचित्र असणेही अनिवार्य आहे. तसेच वाहन भाड्याने घेताना तुमच्याकडे लायसन्स आहे का, हे पाहिले जाते. प्रादेशिक भाषेत छापलेले वा त्यावर प्र्रादेशिक भाषेत तुमचा नाव, पत्ता आदी माहिती असेल, तर ते तिथे ग्राह्य धरले जात नाही. जर्मनीमध्ये तुम्ही सहा महिने वाहन चालवू शकता, तर स्वीत्झर्लंडमध्ये एक वर्ष तशी परवानगी आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही भारतातील ड्रायव्हिंग लायसन्सआधारे १ वर्ष चारचाकी वाहन चालविण्याची परवानगी देण्यात आली. नॉर्वे, आॅस्ट्रेलिया या दोन देशांत भारतीय लायसन्स असेल, तर केवळ तीनच महिने वाहन चालवण्याची परवानगी दिली जाते....तर आंतरराष्ट्रीय लायसन्स आवश्यकया सर्व देशांत ठरलेल्या मुदतीपेक्षा अधिक काळ वाहन चालवायचे असेल, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स घ्यावेच लागते. अन्यथा अर्थात परदेशांत स्थायिक झालेले तसेच शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तिथे जाताच लगेच आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेतात.

टॅग्स :Indiaभारत