शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात मोठा बदल; सरकारची नवीन नियमावली, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 15:17 IST

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, आता तुम्हाला वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही.

नवी दिल्ली - वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारनं वाहन चालकांना होणाऱ्या मोठ्या त्रासातून त्यांची मुक्तता केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जावे लागणार नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत. 

ड्रायव्हिंग चाचणी आवश्यक नाहीसरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, आता तुम्हाला वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम देखील लागू झाले आहेत. एवढेच नाही तर ज्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनाही यातून दिलासा मिळणार आहे.

ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जा आणि प्रशिक्षण घ्यामंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO मधील चाचणीची वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करून घेऊ शकता. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे, अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल.

जाणून घ्या नवीन नियम 

  • प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. 
  • दुचाकी, तीनचाकी व हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांजवळ किमान एक एकर जागा असणे बंधनकारक आहे.
  • मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी केंद्रांसाठी दोन एकर जमीन आवश्यक आहे.
  • ट्रेनर किमान १२वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, वाहतूक नियमांची जाण असावी.
  • मंत्रालयाने अध्यापनाचा अभ्यासक्रमही ठरवून दिला आहे. या अंतर्गत, हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त ४ आठवडे असेल जो २९ तासांचा असेल.
  • ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम २ टप्प्यांमध्ये विभागला जाईल. थेअरी आणि प्रॅक्टिकल
  • लोकांना सामान्य रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतारावर वाहन चालवायला शिकण्यासाठी २१ तास घालवावे लागतील
  • थेअरी टप्पा संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ८ तासांचा असेल, त्यात रस्त्यावरील मार्गदर्शक सूचना समजून घेणे, रस्त्यावरील रेज, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालविण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल.