शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

BMW मधून फिरायची, सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करायची; इन्फ्लूएन्सर जसनीतला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:45 IST

इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो पोस्ट करुन जसनीत कौर लोकांना जाळ्यात ओढायची आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करायची.

लुधीयाना-

इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो पोस्ट करुन जसनीत कौर लोकांना जाळ्यात ओढायची आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करायची. स्वत:ला सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर समजणाऱ्या जसनीत कौर हिला लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. आपले अश्लील फोटो पाठवून आधी समोरच्याचं मन जिंकायचं आणि मग त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं. पुढे मग ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची. तसंच पैसे न दिल्यास गँगस्टरकरवी धमकी देखील द्यायची. 

जसनीत महागड्या बीएमडब्ल्यू कारमधून फिरायची. पोलिसांनी तिला मोहालीतून अटक केली आहे आणि तिची चौकशी सध्या सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जसनीतचे एका राजकीय पक्षाशी संबंध आहेत. तिचा एक मित्र राजकीय पक्षाशी जोडलेला असून तोच तिला या कामात मदत करत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस सध्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. 

दोन दिवसांच्या कोठडीत जसनीत हिची कसून चौकशी केली जाणार आहे. यात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. तसंच पोलीस तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटची देखील तपासणी करत आहेत. जेणेकरुन आणखी कुणाकुणासोबत ब्लकमेलींग केलं गेलंय याची माहिती मिळू शकेल. 

जसनीत कौर विरोधात एफआयआर दाखलमिळालेल्या माहितीनुसार, जसनीत कौर संगरुर येथील रहिवासी आहे. तिचे वडीलांचं निधन झालं आहे. पैसे कमावण्यासाठी तिनं इन्स्टाग्रामवर अश्लील रिल्स बनवण्यास सुरुवात केली. मग हळूहळू फॉलोअर्स वाढू लागले आणि पुढे जाऊन ती ब्लॅकमेलिंगच्या चुकीच्या मार्गाला लागली. तिच्या जवळ ७५ लाख रुपये किमतीची BMW कार असल्याचीही माहिती समोर आली आहे. जसनीत हिनं आतापर्यंत किती जणांना फसवलं आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. 

अश्लील व्हिडिओ अन् फोटोंमुळे प्रसिद्ध झाली जसनीत कौरजसनीत कौर तिच्या अश्लील व्हिडिओ आणि फोटोंमुळेच चर्चेत आली. त्यानंतर तिनं लुधियानाचा व्यावसायिक गुरबीर याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला ब्लॅकमेल करण्यासही सुरुवात केली. याच दरम्यान तिनं व्यापाऱ्याकडे १ कोटी रुपये खंडणी मागितली. गुरबीर यानं याप्रकरणी मोहाली येथे तक्रार दाखल केली होती. 

मोहाली येथून केली गेली अटकखंडणीचे पैसे दिले गेले नाहीत तर गुरबीर याला गँगस्टर्सकडून धमकी देण्याचाही प्रताप तिनं केला होता. गुरबीर लुधियानानं मॉडल टाउन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत जसनीत हिला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी