शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जागेत दारू पिणे गुन्हा नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 06:16 IST

सलीमकुमार बी. एस. याला फेब्रुवारी २०१३मध्ये केरळच्या बाटीअडका पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. वेळ सायंकाळी ७ची होती. एका गुन्ह्यात अटक केलेला आरोपी ओळखण्यास पोलिसांनी त्याला सांगितले.

ठळक मुद्देया गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करावे म्हणून सलीमकुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

खुशालचंद बाहेतीथिरूवनंतपुरम : लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने खासगी जागेत दारू पिणे, हा गुन्हा ठरत नाही किंवा एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास आला म्हणजे तो दारुच्या नशेत होता, असे म्हणता येणार नाही, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

सलीमकुमार बी. एस. याला फेब्रुवारी २०१३मध्ये केरळच्या बाटीअडका पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. वेळ सायंकाळी ७ची होती. एका गुन्ह्यात अटक केलेला आरोपी ओळखण्यास पोलिसांनी त्याला सांगितले. मात्र, सलीमकुमार बी. एस. आरोपीला ओळखू शकला नाही.  त्याच्या तोंडाला दारुचा वास येत होता. म्हणजेच तो दारू प्यायलेला होता व दारुच्या नशेत पोलीस ठाण्यात (सार्वजनिक ठिकाणी) आला, असा आरोप ठेवत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ११८ (अ) केरळ पाेलीस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवला. 

या गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करावे म्हणून सलीमकुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.पोलिसांनी अल्कोमीटरने तपासणी केली; पण त्यांची वैद्यकीय तपासणी किंवा रक्ताची तपासणी केली नव्हती.  त्याच्या तोंडाला दारुचा वास येत होता म्हणजे तो दारुच्या नशेत होता, असे म्हणता येणार नाही. कारण तो बोलावल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झाला. यावरुन तो नशेत नव्हता. त्याचे स्वतःवर नियंत्रण होते. त्याने खासगी ठिकाणी बसून दारू प्यायली असेल तरी त्याच्या पिण्यामुळे कोणाला त्रास, पिडा झाली नसेल तर तो गुन्हा होत नाही, असे म्हणत केरळ उच्च न्यायालयाने दोषारोप पत्र रद्द केले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयliquor banदारूबंदी