शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

DRDO ला ओडिशात करायची होती मिसाइल चाचणी, पण कासवांनी गडबड केली अन्...! काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 19:00 IST

20 किमीच्या परिघात मासेमारीवरही बंदी...

देशातील मुख्य संरक्षण संस्था अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) ओडिशातील व्हीलर बेटावर 3 महिन्यांसाठी मिसाइल टेस्टिंग थांबवली आहे, अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी दिली आहे. ही टेस्टिंग रोखण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, ऑलिव्ह रिडले कासव. या कासवांची घरटी बांधण्याची वेळ नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत असते. यावर्षी सुमारे 5 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी येथे घरटी बांधली आहेत.

यासंदर्भात बोलताना DRDO चे अधिकारी म्हणाले, क्षेपणास्त्र चाचणी दरम्यानचा प्रखर प्रकाश आणि होणाऱ्या आवाजाने कासवांचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

20 किमीच्या परिघात मासेमारीवर बंदी -साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात ऑलिव्ह रिडलेची घरटी तयार होण्यास सुरुवात होते. या वर्षी किनारपट्टीवर पहिला ऑलिव्ह रिडले दिसताच, ओडिशा सरकारने 1 नोव्हेंबर 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत संबंधित परिसरात मासेमारीवर बंदी घातली आहे. ज्या ठिकाणी ऑलिव्ह रिडले आहेत, त्यांत धमारा, देवी आणि रुसीकुल्या नदीच्या परिसराचा समावेश आहे. याला लागून असलेल्या किनारपट्टीच्या 20 किमी परिघात 7 महिन्यांसाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

DRDO नियुक्त करणार नोडल ऑफिसर -मुख्य वनसंरक्षक सुसांता नंदा यांच्या म्हणण्यानुसार, गंजम जिल्ह्यातील रुषिकुल्या किश्तीमध्ये लाखो समुद्री कासवे घरटी करतात. ऑलिव्ह रिडलेचे कवच आणि अंड्यांचा वापर तेल आणि खतासारख्या अनेक गोष्टीत होतो. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होण्याचाही धोका असतो. टीओआयच्या एका वृत्तानुसार, डीआरडीओ कासवांच्या संरक्षणासाठी फॉरेस्ट टीम सोबतच नोडल अधिकाऱ्याचीही नियुक्ती करणार आहे. याशिवाय, मासेमारी करणाऱ्या नौवा या कासवांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी लष्कर आणि तटरक्षक दलही परिसरात गस्त घालेल. 

टॅग्स :DRDOडीआरडीओOdishaओदिशाGovernmentसरकार