शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान अमूल्य; नरेंद्र माेदी यांचे गाैरवाेद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 08:10 IST

एक खासदार आपल्या दायित्वासाठी किती जागरूक असतो याचे डॉ. सिंग प्रेरक उदाहरण आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एक खासदार आपल्या जबाबदारीविषयी किती जागरूक असतो याचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रेरक उदाहरण आहेत. जेव्हा जेव्हा देशातील लोकशाहीची आणि महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा होईल, तेव्हा डॉ. सिंग यांच्या योगदानाची चर्चा निश्चितपणे होईल, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत डॉ. सिंग यांच्यासह निवृत्त होत असलेल्या सदस्यांना निरोप देताना काढले.

एक खासदार आपल्या दायित्वासाठी किती जागरूक असतो याचे डॉ. सिंग प्रेरक उदाहरण आहेत. डॉ. सिंग या सभागृहाचे सहावेळा सदस्य राहिले. काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षाचा विजय होणार हे ठाऊक असूनही डॉ. सिंग सभागृहात मतदान करण्यासाठी व्हिलचेअरवर आले. संसदीय समिती सदस्यांच्या निवडणुकीतही त्यांनी व्हिलचेअरवर येऊन मतदान केले. ते कोणा व्यक्तीला नव्हे तर लोकशाहीला ताकद देण्यासाठी आले होते.राज्यसभेत डिसेंबर २०२३ मध्ये निवृत्त झालेल्या १०, तसेच एप्रिल ते जुलैदरम्यान निवृत्त होणाऱ्या ५८ सदस्यांसह एकूण ६८ सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 

मनमोहन सिंग यांनी मार्गदर्शन करावेnडॉ. सिंग यांनी सदैव प्रेरणा देऊन मार्गदर्शन करावे यासाठी पंतप्रधानांनी त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. nदर दोन वर्षांनी राज्यसभेतील खासदारांना निरोप देण्याचा प्रसंग येतो. निरतंरतेचे प्रतीक हे सभागृह दर दोन वर्षांनी नवी प्राणशक्ती, ऊर्जा, उत्साह प्राप्त करते, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. 

या मंत्र्यांना निरोपनिरोप दिलेल्या सदस्यांमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पुरुषोत्तम रुपाला, राजीव चंद्रशेखर, व्ही. मुरलीधरन या आठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग