शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 16:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद (९०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात उपचार सुरू होते

लखनऊ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद (९०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात उपचार सुरू होते. प्रज्ञानंद यांच्यासह इतर सात बौद्ध भिक्खूंनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. दीक्षा देणाऱ्यांपैकी आता एकही जण हयात नाही. त्यांच्या निधनाने लाखो अनुयायी शोकसागरात बुडाले.मधूमेह आणि उच्च रक्तदाबाने प्रज्ञानंद त्रस्त होते. वयोमानामुळे त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • प्रज्ञानंद यांची देखभाल करणारे भन्ते सुमन काय म्हणाले-

गुरू प्रज्ञानंद मागच्या दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळलेले होते. त्यांना श्वासात अडथळ्यासह मल्टिपल डिसीज होते. तीन दिवसांपासून प्रज्ञानंद यांनी अन्न घेतलेले नव्हते. यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

  • 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांना नागपूरात दिली होती दीक्षा - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. 1950 ते 1956 दरम्यान त्यांच्यावर काही बौद्ध भिक्खूंचा प्रभाव पडला आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या पत्नीसह तसेच हजारो अनुयायांसह बौद्ध धम्माचा अंगीकार केला होता.

  • 13 व्या वर्षी श्रीलंकेतून आले होते प्रज्ञानंद - 

बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचा जन्म श्रीलंकेत झाला होता. 1942 मध्ये प्रज्ञानंद भारतात आले,  त्यावेळी त्यांचे वय फक्त 13 वर्षे होते. प्रज्ञानंद लखनऊच्या रिसालदार पार्कमधील बुद्ध विहारात राहत होते. बाबासाहेबांनी या बुद्ध विहाराला दोन वेळा भेट दिली होती.