शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

डॉ. आंबेडकर संग्रहालयाला पर्यटनस्थळाचा दर्जा, केंद्र सरकारच्या पत्रानंतर पर्यटन विभागाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:10 IST

अलीपूर रोडवरील दुमजली इमारतीत त्यांनी १९५६ मध्ये अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेल्या निवासस्थानी राज्यघटनेची प्रतिकृती साकारून तयार केलेल्या संग्रहालयाचा दिल्लीतील पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.अलीपूर रोडवरील दुमजली इमारतीत त्यांनी १९५६ मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर ही इमारत दुर्लक्षितच होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २ डिसेंबर २००३ रोजी ही जागा राष्ट्राला समर्पित केली.या घरात बाबासाहेबांची अनेक पुस्तके व साहित्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या जागेवर स्मारकाबरोबरच डॉ. आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय तयार करण्याचा निर्णय घेतला.राज्यघटनेची प्रतिकृती व बौद्ध संस्कृतीचा समावेश असलेले हे संग्रहालय दोन एकरात असून त्यासाठी १०० कोटी खर्च केले आहेत. मोदी यांनी गेल्या वर्षी संग्रहालयाचे उद्घाटन केले.केंद्राने दिल्ली सरकारला संग्रहालयाचे दिल्लीतील पर्यटनस्थळांत समावेश करण्याची विनंती केली. दिल्ली पर्यटन विभागाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर सोबती यांनी ही माहिती दिली.संग्रहालयाचे डेप्युटी क्युरेटर अधिकारी एस. व्ही. वानखेडे व कन्झर्व्हेटर सुधाकर शर्मा म्हणाले की, संग्रहालयाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.संग्रहालयातील मुख्य आकर्षण- संग्रहालयात डॉ. आंबेडकर यांची अनेक छायाचित्रे आहेत. पुस्तके, व्हायोलिन, खुर्ची, टेबल व इतर साहित्यही जतन केले आहे. डॉ. आंबेडकर बौद्ध धर्माकडे कसे आकर्षित झाले याचा प्रवासही इथे पाहायला मिळतो. सांची स्तुपासह बौद्ध संस्कृतीवरील निर्मितीमुळे हे संग्रहालय आकर्षक ठरले आहे.जगभरातील पर्यटक इथे भेट देऊ शकतील. देशभरातील लोकांचा ओढा वाढला आहेच. संग्रहालयाला भेट दिल्यावर डॉ. आंबेडकरांचे जीवन सहजपणे समजून घेणे शक्य होईल.- एस. व्ही. वानखेडे,संग्रहालयाचे डेप्युटी क्युरेटर

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर