शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या तत्काळ तिकीट यंत्रणेवर संशयाचे सावट; मिनिटात लागते ७३% प्रवाशांना ‘वेटिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:39 IST

तिकिटे अगोदरच बुक केली जातात का, अशी शंका निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय रेल्वेची ‘तत्काळ तिकीट’ सेवा, अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी मानली जात होती, मात्र आता ती अडचणीचे कारण बनली आहे. ३९६ जिल्ह्यांतील ५५,००० हून अधिक प्रवाशांना सोबत घेत केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘लोकलसर्कल’च्या सर्वेक्षणानुसार, ७३% प्रवाशांनी सांगितले की, त्यांना तत्काळ तिकीट बुकिंग विंडो उघडल्यानंतर एका मिनिटातच वेटिंग यादीत टाकण्यात आले. यामुळे तिकिटे अगोदरच बुक केली जातात का, अशी शंका निर्माण झाली आहे.

आयआरसीटीसीवरील विश्वास झाला कमी

आता फक्त ४०% प्रवासी तिकिटे बुक करताना आयआरसीटीसीवर विश्वास ठेवतात. बाकीचे एकतर ट्रॅव्हल एजंटची मदत घेतात किंवा रेल्वे स्टेशनवर जाऊन लांब रांगेत उभे राहतात. अधिकृत एजंट आणि काही तांत्रिक तज्ज्ञ सॉफ्टवेअर बॉट्स वापरतात किंवा विशेष टूल वापरून बुकिंग सुरू होताच हाय स्पीडने तत्काळ तिकिटे बुक करतात, असा संशय वाढला आहे.

२०१६ मध्ये घोटाळा

रेल्वेने २०१६ मध्ये तत्काळ तिकीट घोटाळा उघडकीस आणला होता. यात काही ट्रॅव्हल एजंट बनावट नावांनी तिकिटे बुक करत होते आणि नंतर ‘नाव बदलण्याच्या पर्याया’द्वारे ती खऱ्या प्रवाशांना तिकिटे पैसे देत होते. यासाठी ते रेल्वे कर्मचाऱ्यांशी संगनमत करत होते.यानंतर, रेल्वेने अनेक सुधारणात्मक उपाययोजना केल्या. मात्र, या उपाययोजना असूनही, सिस्टममधील त्रुटी अजूनही कायम आहेत आणि एजंट्सची पकड अजूनही कमी झालेली नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले.

मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये  तत्काळ बुकिंग करण्याचा प्रयत्न केला. मी सकाळी १० वाजता  क्लिक केले तेव्हा पेज लोड होण्यास सुरुवात झाली आणि काही सेकंदात सर्व सीट भरल्या गेल्या.-राजेंद्र खंडेलवाल, प्रवासी

रेल्वेची ऑनलाइन तिकीट प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आहे. तत्काळ तिकीट प्रणालीमध्ये, प्रत्येक १० जागांसाठी ऑनलाइन रांगेत एक हजाराहून अधिक लोक असतात.-दिलीप कुमार, कार्यकारी संचालक, रेल्वे बोर्ड (माहिती आणि प्रसिद्धी)

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वेticketतिकिट