शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीत दुपटीने वाढ, रसद तोडण्याचे बीएसएफसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 07:53 IST

Pakistani drones: सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना पाकिस्तान सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या ड्रोनचा २०२२ मध्ये जवळपास दुप्पट संख्येने सामना करावा लागला. 

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना पाकिस्तान सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या ड्रोनचा २०२२ मध्ये जवळपास दुप्पट संख्येने सामना करावा लागला. पाकने अंमलीपदार्थ, शस्त्रे आणि दारूगोळा भारतीय हद्दीत देशविघातक शक्तींना पोहोचविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती दलाचे महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी दिली. 

बीएसएफने अलीकडेच ड्रोन फॉरेन्सिकचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील एका शिबिरात एक अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्याचे परिणाम खूप उत्साहवर्धक आहेत. या प्रयोगशाळेसाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करण्यात आला. यासाठी संरक्षण क्षेत्रातील जाणकारांची मदत घेतली आहे. तंत्रज्ञान-जाणकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंचे मनुष्यबळ तेथे तैनात आहे. सुरक्षा यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून या सीमापार बेकायदेशीर कृतीत सामील असलेल्या गुन्हेगारांचा उड्डाण मार्ग आणि पत्तादेखील शोधू शकतात, असे पंकजकुमार यांनी सांगितले.

घातपातासाठी वापर- ‘बीएसएफला गेल्या काही काळापासून ड्रोनच्या धोक्याचा सामना करावा लागला आहे. - ड्रोनच्या वैशिष्ट्यांचा शत्रूकडून वाईट कामांसाठी वापर होत आहे, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधल्या जात आहेत, ड्रोनमुळे सीमा ओलांडून घातक गोष्टी पाठविणे सोपे झाले. -  त्यामळे ड्रोनचे एक नवे आव्हान उभे राहिले आहे,’ अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

कशी होते घुसखोरी? बीएसएफने २०२० मध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सुमारे ७९ ड्रोन उड्डाणे शोधून काढली, ती गेल्यावर्षी १०९ पर्यंत वाढली आणि या वर्षी २६६ एवढी झाली आहे. यावर्षी पंजाबमध्ये २१५ ड्रोनने घुसखोरी केली, तर जम्मूमध्ये २२.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत