शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

‘डबल इंजिन’ सरकारने जिंकला जनतेचा विश्वास; लोकसभा अन् राष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग झाला सोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:57 IST

योगींनी बदलले राजकारण. योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला.

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळवित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपने आणखी एक इतिहास रचला आहे. देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील जनतेने सुमारे ३७ वर्षांनंतर एखाद्या पक्षाला सत्तेत पुनरागमनाची संधी देऊन बहुमत दिले आहे. यामुळे देशभरात मुख्यमंत्री योगी यांची प्रतिमा उंचावली आहे.

या विजयाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. हा मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे मानले जात आहे. योगींच्या रूपाने भाजपच्या भविष्याची झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मार्ग सोपा झाल्याचाही तर्क आहे. याबरोबरच राष्ट्रपती निवडणुकीतही भाजपच्या या विजयाची मदत होणार आहे.

जनतेच्या विश्वासाचा विजयशाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, सब का साथ सबका विकास व सबका विश्वास, ही केवळ घोषणा नाही, तर वस्तुस्थिती आहे. मोदी हे विश्वासाचे दुसरे नाव झाले आहे. या निकालाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही मोठ्या बहुमताचे सरकार बनवू, याचाही विश्वास दिला आहे.

‘गँगस्टर’वर घातला घावमार्च २०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर योगींनी यूपीचे वातावरण बदलण्याचे काम केले. पहिला घाव गुन्हेगार व माफियांवर घातला. गुन्हेगारांनी एक तर गुन्हे सोडावेत किंवा यूपी सोडावे, असे आवाहनच त्यांनी केले. राज्यात गँगस्टर ॲक्टनुसार अब्जावधी रुपयांची अवैध संपत्ती जप्त केली. २०१७ नंतर योगी सरकारने बारा हजारांपेक्षा जास्त वाँटेड गुन्हेगारांना अटक केल्याचा दावा केला. ६८० जणांविरुद्ध एनएसए लावला. गुन्हेगारांच्याविरोधात १५ हजार गुन्हे दाखल करून १,९०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. मुख्तार अन्सारी व अतिक अहमदसारख्या बाहुबलींविरोधात कारवाई करून नवीन धडा घालून दिला.

हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी यांच्यावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. जाती व धर्माचा विचार न करता समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या विकासाचे धोरण अवलंबल्यामुळेच हे शक्य झाले.- मुख्तार अब्बास नकवी,केंद्रीय मंत्री 

योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला. यूपीत ५.७७ कोटींपेक्षा अधिक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत २.८२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाले.१.६७ कोटी गरीब महिलांना उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर दिले. राज्यात १.१६ कोटी लोकांना मागीलवर्षी मनरेगा योजनेत काम मिळाले. स्वच्छ भारत अभियानात मागील आठ वर्षांत राज्यात २.२२ कोटी शौचालये उभारण्यात आली. पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत यूपीमध्ये गरीब कुटुंबांसाठी १२.१४ लाख घरे तयार करण्यात आली. याशिवाय केंद्र व राज्य सरकारांच्या अनेक योजनांद्वारे पैसा थेट लोकांच्या खिशात पोहोचविला. यामुळे महागाई व बेरोजगारीची तीव्रता कमी झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२