शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

डोकलाम विवाद : नियंत्रण रेषेवर चिनी ड्रॅगनची घुसखोरी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 9:39 AM

डोकलाम विवादामुळे भारतीय लष्कर आणि चिनी सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत चिनी सैनिकांच्या कुरापतींचा जशास तसा प्रतिकार करण्यासाठी भारतीय लष्कर तयारीत करत आहे.

नवी दिल्ली, दि. 17 - डोकलाम विवादामुळे भारतीय लष्कर आणि चिनी सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत चिनी सैनिकांच्या कुरापतींचा जशास तसा प्रतिकार करण्यासाठी भारतीय लष्कर तयारीत करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर (LAC) चीनकडून घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गंभीर बाब म्हणजे बुधवारी दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं लडाखमध्ये  बॉर्डर पर्सनल मीटिंग (BPM) झाल्यानंतर घुसखोरी या शक्यतांनी डोकं वर काढले आहे.

यापूर्वी चिनी सैनिकांनी मंगळवारी (15 ऑगस्ट) सकाळी दोनदा लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. यावेळी भारतीय लष्कर व चिनी सैनिकांमध्ये दगडफेक झाल्याचीही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीपल्स लिब्रेशन आर्मी आता कदाचित चीन-भूतान- सिक्कीम या परिसरातील भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर चिनी सैनिकांचा सामना करण्याच्या तयारीत आहे.  तर आणखी एका सूत्रांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, ज्याप्रमाणे मंगळवारी चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे आगामी काळात पुन्हा लडाख परिसरातही काही हरकती होण्याची शक्यता आहे. शिवाय, अरुणालचल प्रदेश किंवा हिमाचल- उत्तराखंडातील बाराहोतीमध्येही चीनकडून खुसखोरी होण्याची शक्यता आहे. 

तर 'चीन युद्ध छेडण्याचा धोका पत्करणार नाही', असा विश्वास भारतीय लष्कराशी संबंधित अधिका-यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे. चीननं तिबेट मिलिट्री डिस्ट्रिक्टच्या दक्षिण आणि सुदूर परिसरात सैन्याची तुकडी, तोफखाने तैनात केले आहेत. हा परिसर पीएलएच्या वेस्टर्न थिअटर कमांट(WTC) अंतर्गत येतो.

दरम्यान,  डोकलाममधील विवादानंतर चीनने सुरू केलेले युद्धाच्या धमक्यांचे सत्र थांबता थांबत नाही आहे. वारंवार धमक्या देऊनही डोकलाममधून माघार घेण्यास तयार नसलेल्या भारतासोबत युद्ध करण्याची तयारी चीनने पूर्ण केली असून, युद्धाच्या तयारीचा भाग म्हणून आवश्यक तो रक्तसाठा गोळा करण्यास सुरुवात केली आहे, असा दावा चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्ता हा दावा करण्यात आला आहे. चीनमधील विविध प्रांतांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त गोळा करण्यात येत आहे. तसेच देशातींल रुग्णालयांनीसुद्धा रक्ताचा वापर नियंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार पीएलएकडून (पीपल्स लिबरेशन आर्मी) ब्लड बँक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली आहे. देशातील रक्तसाठा भूकंपाआधी च्योचायको प्रांतात स्थलांतरीत करण्यात आला होता. त्यानंतर तो साठा तिबेटमध्ये हलवण्यात आला. 

आता डोकलाममधून भारताने माघार घेतली तरी चीन या प्रकरणी शांत राहणार नाही. आता भारताची माघार हे या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. भारताला त्याच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील, असे  चायनीज अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटर्जीच्या निर्देशकांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे. तसेच  हत्यारे आणि सैन्य अधिकाऱ्यांच्या गुणवत्तेच्याबाबतीत चीन भारताला वरचढ आहे, असाही दावा करण्यात आला आहे.  

दरम्यान, चिनी सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाची आपल्याला अजिबात कल्पना नाही असे चीनकडून सांगण्यात आले. सीमेवर शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे चीनने म्हटले आहे. सीमेवर सर्तक असलेल्या जवानांनी मंगळवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी बाचाबाचीचे पर्यावसन दगडफेकीच्या घटनेत झाले. दोन्ही बाजूकडून झालेल्या दगडफेकीमध्ये दोन्ही देशांचे जवान किरकोळ जखमी झाले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या ह्यु च्युनयींग यांना यासंबंधी विचारले असता आपल्याला यासंबंधी काहीही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. नियंत्रण रेषेजवळ नेहमीच चीनचे सैनिक गस्त घालत असतात असे त्यांनी च्युनयींग यांनी सांगितले. सीमारेषेसंबंधी दोन्ही देशांमध्ये जे करार आहेत त्याचे पालन करण्याची आम्ही भारताला विनंती करत आहोत, असे त्या म्हणाल्या.