शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

न्यायालय म्हणजे मासळी बाजार नव्हे; लोया प्रकरणातील वकिलांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 08:50 IST

तुम्ही स्वर्गात वा नरकात, वाट्टेल तिथे जा, असे त्यांनी सहकारी वकिलांना उद्देशून म्हटले.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या न्या. लोया मृत्यू प्रकरणामुळे सुप्रीम कोर्टातील वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. सोमवारी ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणात बाजू मांडणाऱ्या दोन वरिष्ठ वकिलांना फटकारले. न्यायालयाला मासळी बाजाराच्या पातळीला आणून ठेवू नका, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी या वकिलांना समज दिली. सुप्रीम कोर्टात काल याप्रकरणाची सुनावणी सुरू असताना वरिष्ठ वकील अॅड. दुष्यंत दवे आणि अॅड. पल्लव सिसोदिया यांच्यात  शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी दुष्यंत दवे यांचा आवाज प्रचंड चढला होता. यावेळी खंडपीठातील न्यायमूर्तींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता दवे यांनी त्यांनाही जुमानले नाही. त्यामुळे खंडपीठातील न्यायमूर्तींनी दोन्ही वकिलांची चांगलीच कानउघडणी केली . तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला मासळी बाजाराच्या पातळीला आणून ठेवू नका. हे कदापि  खपवून घेतले जाणार नाही. न्यायमूर्ती काही बोलत असतील त्यांना शांत बसवून तुम्ही स्वत:चे बोलणे पुढे रेटू शकत नाही. तुम्ही आमचे ऐकलेच पाहिजे. तुम्हाला संधी दिली जाईल, तेव्हा तुम्ही आपली बाजू मांडावी, असे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी अॅड. दुष्यंत दवे यांना सुनावले. त्यावरही दवे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. नाही, मी तसे करणार नाही. परंतु, तुम्ही अॅड. पल्लव सिसोदिया (याचिककर्त्यांचे वकील) आणि हरिष साळवे (महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकील) यांना खटला लढवण्यापासून रोखले पाहिजे. तुमच्या सदसदविवेकबुद्धीला स्मरून तुम्ही याचा निर्णय घेतला पाहिजे, असे अॅड. दवे यांनी म्हटले. तेव्हा खंडपीठातील दुसरे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकरही प्रचंड संतापले. तुम्ही आम्हाला सदसदविवेकबुद्धी म्हणजे काय ते शिकवण्याची गरज नाही. असे न्या. खानविलकर यांनी म्हटले. 

तर दुसरीकडे अॅड.पल्लव सिसोदिया यांचीही न्यायालयाने हजेरी घेतली. अॅड.पल्लव सिसोदिया यांनी म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने या प्रकरणाच्या सुनावणीविषयी आक्षेप घेण्याची संधी दिली. या प्रकरणाची एकतर्फी चौकशी होऊ शकत नाही, की ज्यात आरोप करणारी व्यक्ती या न्यायालयाच्या प्रतिष्ठेला आणि आस्थेला धक्का लावतील आणि तरीही सहज सुटतील. सिसोदिया यांचे हे वक्तव्य ऐकून अॅड. दवे आणि अॅड. इंदिरा जयसिंह आक्रमक झाल्या. जर तुमच्या अशिलाला याप्रकरणाची चौकशीच हवी नव्हती तर त्यांनी याचिकाच दाखल का केली, असा सवाल त्यांनी विचारला. यापूर्वी तुम्ही अमित शहांचे वकील होतात आणि आता याचिककर्त्यांची बाजू मांडत आहात, असे अॅड. दवे यांनी म्हटले. त्यावर सिसोदिया प्रचंड संतापले. तुम्ही काय बोलत आहात याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. तुम्ही स्वर्गात वा नरकात, वाट्टेल तिथे जा, असे त्यांनी सहकारी वकिलांना उद्देशून म्हटले. सिसोदिया यांच्या या वाक्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला. या एकूणच शाब्दिक देवाणघेवाणीमुळे सुप्रीम कोर्टातील वातावरण प्रचंड तापले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण