शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष सोडू नका, तेथे राहूनच आमचे काम करा; केजरीवाल यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 11:55 IST

आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी आपल्या दोनदिवसीय गुजरात दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राजकोटमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन केले.

राजकोट : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी पक्षातच राहून आम आदमी पार्टीचे (आप) काम करण्याचे आवाहन केले. 

आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी आपल्या दोनदिवसीय गुजरात दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राजकोटमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाकडून रसद मिळवणे सुरू ठेवावे. मात्र, तेथे राहूनच त्यांनी ‘आप’साठी काम करावे. राज्यात आपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनाही सामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळेल. 

भाजपाने आपले कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नि:शुल्क व दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा, मोफत वीज यासारख्या सुविधा दिल्या नाहीत. मात्र, आम आदमी पार्टी त्यांच्या कल्याणाची काळजी घेईल. भाजपा कार्यकर्ते आपल्या पक्षात राहूनच आपचे काम करू शकतात. यातील अनेकांना भाजपाकडून पैसे मिळतात. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे घ्या, पण काम आमच्यासाठी करा. कारण, आमच्याकडे पैसे नाहीत, असेही केजरीवाल म्हणाले.

- गुजरातमध्ये आमचे सरकार सत्तारूढ झाल्यास आम्ही मोफत वीज देणार आहोत आणि ती भाजप कार्यकर्त्यांनाही मिळेल. आम्ही तुम्हाला २४ तास नि:शुल्क वीज पुरवू, तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा उभारू, तेथे त्यांना नि:शुल्क शिक्षण मिळेल. - आम्ही तुमच्या कुटुंबीयांसाठी नि:शुल्क  दर्जेदार वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून देऊ, असेही केजरीवाल म्हणाले. - आपचे गुजरातमधील नेेते मनोज सोरथिया यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करून केजरीवाल यांनी आपला पाठिंबा दिल्यामुळे गुजरातमधील अनेक लोकांवर आणखी हल्ले होतील, अशी भीती व्यक्त केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी