शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
4
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
5
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
6
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
7
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
8
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
9
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
10
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
11
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
12
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
13
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
14
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
15
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
16
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
17
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
18
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
19
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
20
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:19 IST

मुद्द्याची गोष्ट : बांगलादेशात गेल्या काही दिवसांत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या घटना केवळ अंतर्गत अस्थिरतेचे लक्षण नाहीत, तर त्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी थेट जोडलेल्या आहेत. १९७१ मध्ये भारताच्या निर्णायक हस्तक्षेपातून जन्माला आलेल्या बांगलादेशात आज भारतविरोधी आणि अल्पसंख्याकविरोधी वातावरण बळावत आहे.

कर्नल (निवृत्त) विनायक तांबेकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक -

बांगलादेशातहिंदू व्यक्तींवर अत्याचार, हिंसाचार अशा घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. त्याची दखल भारत सरकारला घ्यावी लागेल. कारण, बांगलादेशाचे भौगोलिक स्थान आाणि तेथील राजकीय परिस्थिती. बांगलादेशाची निर्मिती ही भारत सरकारने १९७१ मध्ये केली, हे निर्विवाद ऐतिहासिक सत्य आज तेथील मुस्लीम जनतेच्या स्मृतीतून पुसले जात असल्याचे सध्याच्या घटनांवरून स्पष्ट होते. एकेकाळचा पूर्व पाकिस्तान हा भारताच्या नकाशावर काट्यासारखा रुतलेला होता. सुमारे १,४८,००० चौरस किमी क्षेत्रफळ आणि १७ कोटी लोकसंख्येचा हा प्रदेश भारताच्या फाळणीत झालेल्या मोठ्या राजकीय चुकीचे प्रतीक ठरला. त्या चुकीचे परिणाम भारताला दीर्घकाळ भोगावे लागले. अखेर १९७१ मध्ये भारताने धाडसी निर्णय घेत बांगलादेशाची निर्मिती केली. मात्र आज त्याच देशात भारतविरोधी सूर आणि अल्पसंख्याकविरोधी हिंसाचार वाढताना दिसत आहे, ही बाब भारतासाठी गंभीर चिंतेची आहे.

१९७१चे युद्ध आणि भारताने केलेला निर्णायक हस्तक्षेप -१९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार आणि तत्कालीन लष्करी पूर्व विभागाचे लेफ्टनंट जनरल जगजीतसिंह अरोरा यांच्या उत्कृष्ट लष्करी योजनेनुसार अवघ्या १४ दिवसांत बांगलादेशाची निर्मिती झाली. ही घटना जागतिक लष्करी इतिहासात अभूतपूर्व ठरली. तब्बल ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली. ले. जनरल अरोरा यांनी तत्कालीन पूर्व पाकिस्तानचे लष्करी प्रमुख जनरल नियाझी यांच्याकडून शरणागतीपत्रावर सही घेतानाचे छायाचित्र जगभर गाजले. १६ डिसेंबर १९७१ हा दिवस आजही ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सॅम मानेकशा यांनी केले.

बहुसंख्याकवाद आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले १७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात सुमारे १५ कोटी मुस्लीम आहेत. या बहुसंख्येच्या बळावर हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या देवळांवर, चर्चवर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले. यामागे युनूस यांच्या नेतृत्वाखालील अकार्यक्षम सरकार कारणीभूत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात शरीफ उस्मान हादी यांचा खून झाला. ही व्यक्ती पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांची विरोधक होती. तसेच हिंदू तरुण पुढारी दीपूचंद्र दास यांची हत्या ही बांगलादेशातील वाढत्या अराजकतेचे ठळक उदाहरण ठरते.

निवडणुका, सत्तासंघर्ष आणि भारताची चिंता येत्या फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात होणाऱ्या निवडणुकांकडे भारतासह जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीकडून खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान उतरतो आहे. आवामी लीगविरुद्ध बीएनपी अशी थेट लढत अपेक्षित आहे. तारिक रहमान गेली १०-१२ वर्षे जिवाला धोका असल्याने लंडनमध्ये वास्तव्यास होता. जिवाला धोका असल्यामुळे शेख हसीना भारतात, दिल्लीत राहत आहेत. त्यांच्या आवामी लीग पक्षावर बांगलादेशात बंदी आहे. त्यामुळे या निवडणुकीतून उदयास येणारे सरकार हिंदू आणि भारतविरोधी भूमिका घेते की नाही, याकडे भारताला सावध नजरेने पाहावे लागणार आहे.

सीमावर्ती राज्यांसमोरील गंभीर आव्हान सुमारे १,४८,००० चौरस किमी क्षेत्रफळाचा बांगलादेश भारतासाठी आज डोकेदुखी ठरत आहे. तेथून आसाम व त्रिपुरा या राज्यांत होणारी घुसखोरी हा गंभीर प्रश्न बनला आहे. खोटे आधार कार्ड, रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे मिळवून स्थानिक रहिवासी असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. आसाम सरकारने या घुसखोरीविरोधात ठोस पावले उचलून अनेक प्रकरणे उघडकीस आणली. मात्र ही समस्या कायदा-सुव्यवस्थेपुरती मर्यादित नसून, ती भारताच्या अंतर्गत सुरक्षेला थेट आव्हान देणारी आहे.

- १७ कोटी लोकसंख्या बांगलादेशची आहे.

- १५ कोटी मुस्लीम  बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येपैकी आहेत. या बहुसंख्येच्या बळावर हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या देवळांवर, चर्चवर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले.

- १४ दिवसांत बांगलादेशाची निर्मिती झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't Forget History: Your Birth is Because of Us

Web Summary : Analyst Vinayak Tambekar highlights Bangladesh's creation by India in 1971, now facing rising anti-India sentiment and minority violence. Upcoming elections and border issues pose challenges, demanding India's vigilance to protect its interests and security.
टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीम