शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 10:27 IST

Caste Survey : कर्नाटकात केलेल्या शेवटच्या सर्वेक्षणात, लिंगायत समुदायाचे प्रमाण राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के होते, हे अनुसूचित जातींच्या १८ टक्के आणि मुस्लिमांच्या १३ टक्के लोकसंख्येपेक्षा खूपच कमी आहे.

Caste Survey :कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वीच नवीन वादाला सुरुवात झाली आहे. लिंगायतांच्या सर्वोच्च संस्थेने कर्नाटकातील प्रभावशाली समुदायाच्या सदस्यांना आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणात स्वतःची ओळख 'वीरशैव-लिंगायत' म्हणून करण्याचे आवाहन केले आहे.  या आवाहनामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लिंगायत समाजाचा हा मुद्दा संवेदनशील ठरत आहे. कारण या समुदायाची मागील अनेक वर्षापासून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी करत आहेत. 

उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल

२२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जात जनगणनेच्या प्रक्रियेच्या काही आठवड्यांपूर्वीच या संदर्भातील अधिकृत पत्र समोर आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह एआयसीसी नेतृत्वाच्या सूचनेनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यात हे सर्वेक्षण सुरू करणार आहेत. याशिवाय, ही सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

भाजपच्या हिंदू व्होट बँक धोक्यात येऊ शकते

जर लिंगायत समुदायाच्या लोकांनी त्यांच्या सर्वोच्च संस्थेने केलेला आवाहन स्वीकारले तर मोठ्या संख्येने लोक भारतीय जनता पक्षाच्या मुख्य हिंदू व्होट बँकेपासून वेगळे होतील.

राज्यात केलेल्या शेवटच्या सर्वेक्षणात कर्नाटकातील लिंगायत समुदायाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के होती, ही लोकसंख्या राज्यातील १८ टक्के अनुसूचित जाती आणि १३ टक्के मुस्लिम लोकसंख्येपेक्षा कमी आहे. हीा माहिती समोर आल्यानंतर अखिल भारतीय वीरशैव-लिंगायत महासभेने लिंगायत समुदायाला हे आवाहन केले आहे.

लिंगायत समाजाच्या नेत्यांनी अनेकदा राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १७% असल्याचा दावा केला आहे. उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाजाचे नेते एमबी पाटील आणि लक्ष्मी हेब्बलकर यांनी अंदाजांवर आधारित दावा केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीशी उघडपणे असहमती दर्शविली आहे. समुदायाची लोकसंख्या अहवालात नमूद केलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त असल्याचा त्यांनी दावा केला.

टॅग्स :Karnatakकर्नाटक