शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

घरी बसून हताश होऊ नका, चांगल्या सवयी लावून घ्या!, ‘लॉकडाऊनग्रस्त’ नागरिकांना सरकारचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:27 IST

सक्तीच्या गृहबंदिवासाचा पहिला दिवस मावळण्याच्या आधीच केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (पीआयबी) या प्रसिद्धी विभागाने मनात आणले तर या मोकळ्या वेळेत बरेच काही केले जाऊ शकते, असे ट्विटरवरून सुचविले.

नवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’मुळे २१ दिवस घरातच बसावे लागणार असल्यामुळे हताश न होता उलट ही चांगली संधी आहे, असे मानून स्वत:चे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या तीन आठवड्यांत चांगल्या सवयी लावून घ्या, असे आवाहन केंद्र सरकारने मंगळवारी नागरिकांना केले.सक्तीच्या गृहबंदिवासाचा पहिला दिवस मावळण्याच्या आधीच केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (पीआयबी) या प्रसिद्धी विभागाने मनात आणले तर या मोकळ्या वेळेत बरेच काही केले जाऊ शकते, असे ट्विटरवरून सुचविले.याआधी पंतप्रधानांनी गेल्या रविवारी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. तेव्हा ‘पीआयबी’ने ‘माय १४ फॉर इंडिया’ हा विशेष हॅशटॅग सुरू केला होता व त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांसह आघाडीच्या पत्रकारांनी या ऐच्छिक सुट्टीत आपण काय करणार, याची मनोगते त्यावर शेअर केली होती. देशव्यापी ‘लॉकडाऊन’ आता सुरू झाला असला तरी अनेक राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर तो गेले काही आठवडे सुरू आहे. तेव्हापासून ‘लॉकडाऊन’मध्ये मी काय करतोय किंवा तुम्ही काय करू शकता, हे एकमेकांना सांगणे व त्याचे फोटो, विनोद अथवा अन्य मजकूर शेअर करणे हा समाजमाध्यमांवर गरमागरम विषय बनला आहे. ‘जशी प्रजा, तसा राजा’ या विरुद्ध उक्तीला जागून सरकारही आता त्यात सामील झाले आहे.पीआयबीचे ट्विटएका ट्विटमध्ये ‘पीआयबी’ म्हणते की, आजपासूनचे पुढचे २१ दिवस तुम्ही सकाळी लवकर उठणे, नवे डाएट अनुसरणे व ध्यानधारणा करणे, यांसारख्या नव्या, साध्या, सोप्या सवयी लावण्यासाठी सत्कारणी लावू शकता. अमेरिकी लेखक मॅक्स्वेल माल्ट््झ यांचा दाखला देत ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, २१ दिवसांत एखादी वाईट सवय सुटू शकते किंवा नवी चांगली सवय लावून घेता येते. तुम्हीही या ‘लॉकडाऊन’चा तशा प्रकारे आपल्याच भल्यासाठी उपयोग करून घ्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या