राम मंदिरासाठी १५ जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी; १०, १०० आणि १ हजार रुपयांचे कूपन

By मोरेश्वर येरम | Published: December 16, 2020 06:21 PM2020-12-16T18:21:49+5:302020-12-16T18:23:58+5:30

देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी १०, १०० आणि १००० रुपयांचे कूपन तयार करण्यात आले आहेत. वर्गणी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्री रामाचा फोटो दिला जाणार असल्याचंही राय म्हणाले. 

donation for Ram Mandir will be collected from January 15 Coupons of Rs 10 100 and Rs 1000 | राम मंदिरासाठी १५ जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी; १०, १०० आणि १ हजार रुपयांचे कूपन

राम मंदिरासाठी १५ जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी; १०, १०० आणि १ हजार रुपयांचे कूपन

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या वर्षात मकरसंक्रांतीपासून राम मंदिरासाठी वर्गणी जमा केली जाणारदेशातील प्रत्येकाचा मंदिराच्या निर्माणात हातभार लागावा यासाठी वर्गणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन वर्गणी जमा करणार

नवी दिल्ली
अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू आहे. मंदिरासाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद यासाठी एक मोहिम राबविणार असून याची सुरुवात नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या दिवसापासून होणार आहे. 

विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि रामजन्म भूमी तीर्थस्थानचे सचिव चंपत राय यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. "अयोध्येत उभारलं जात असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्ताची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घराघरात जाणार आहेत", असं चंपत राय म्हणाले. 

नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या म्हणजेच १५ जानेवारीपासून विहिंपचे कार्यकर्ते देशात घरोघरी जाऊन वर्गणी जमा करणार आहेत. देशातील चार लाख गावांमध्ये जवळपास ११ कोटी कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याची विहिंपची मोहीम आहे. देशातील प्रत्येक जात, समाज आणि पंथाच्या नागरिकांचा देशातील या भव्य मंदिराला हातभार लागला पाहिजे, अशी यामागची संकल्पना असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं. 

देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी १०, १०० आणि १००० रुपयांचे कूपन तयार करण्यात आले आहेत. वर्गणी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्री रामाचा फोटो दिला जाणार असल्याचंही राय म्हणाले. 

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारण्याची तयारी सुरू आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गुवाहटी येथील आयआयटी, सीबीआरआय, एल अँड टी, टाटाचे इंजिनिअर मंदिराच्या भक्कम पायाबाबतच्या आराखड्यावर काम करत असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं. 
 

Web Title: donation for Ram Mandir will be collected from January 15 Coupons of Rs 10 100 and Rs 1000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.