शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भारतातील निवडणुकांबाबत डोनाल्ड ट्रम्प बोलले असं काही, आता भाजपाचे नेते शेअर करताहेत व्हिडीओ   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:08 IST

Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील मतदान वाढवण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर सुमारे १७४ कोटी रुपये देण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील मतदान वाढवण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर सुमारे १७४ कोटी रुपये देण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच इतर कुणाला तरी जिंकवण्यासाठी या रकमेचा वापर केला गेला असावा अशी शक्यताही वर्तवली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मियामीमधील एका संमेलनामध्ये सांगितले की, आम्ही भारतातील मतदानासाठी २१ दशलक्ष डॉलर का खर्च करत आहोत? याबाबत भारत सरकारला सांगितलं पाहिजे. ही बाब नक्कीच धक्कादायक आहे.

अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सी (डीओजीई)ने  यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने भारतामध्ये मतदान वाढवण्यासाठी ही रक्कम दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी खर्चात कपात करण्यासाठी बनवलेल्या डीओजीईने अमेरिकेतील करदात्यांचा पैसा कुठे खर्च होत आहे हे सांगितले आहे. 

यामध्ये भारतासाठी २१ दशलक्ष डॉलर, बांगलादेशसाठी २९ दशलक्ष डॉलर आणि नेपाळसाठी ३९ दक्षलक्ष डॉलरच्या योजनांचा समावेश होता. मात्र हे सर्व निधी आता रद्द करण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही मुर्खासारखा निधी देणाऱ्या यूएसएआयडीला  एक महिन्यामध्ये बंद केलं आहे. आतापर्यंत आम्ही ५५ अब्ज डॉलर वाचवले आहेत. तसेच ही केवळ सुरुवात आहे.

डीओजीईच्या या गौप्यस्फोटानंतर भारतातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपा नेते अमित मालविय यांनी सांगितले की, भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये हा बाहेरून झालेला हस्तक्षेप आहे. यातून फायदा कुणाला होणार? भाजपाला तर फायदा होणार नाही. परदेशी संस्थांच्या माध्यमातून भारतातील संस्थांमध्ये नियोजनबद्धरीत्या घुसखोरी सुरू आहे, असा दावाही मालविय यांनी केला.   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIndiaभारतElectionनिवडणूक 2024