शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"दबदबा है और दबदबा रहेगा", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 17:41 IST

माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही संजय कुमार सिंह यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघ म्हणजेच WFI च्या निवडणुकीत संजय कुमार सिंह यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. संजय कुमार सिंह यांच्या विजयानंतर त्यांची माजी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भेट घेतली. संजय कुमार सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते.

माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही संजय कुमार सिंह यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय कुस्तीवरील ग्रहण लवकरच संपणार असल्याचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. "हा माझा वैयक्तिक विजय नसून देशातील कुस्तीपटूंचा विजय आहे. मला आशा आहे की नवीन महासंघाच्या स्थापनेनंतर कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू होतील. 11 महिने कुस्तीवर लागलेले ग्रहण आता दूर होणार आहे", असे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले.

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय कुमार सिंह यांचा विजय हा त्या कुस्तीपटूंसाठी मोठा धक्का मानला जात आहे, ज्यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, संजय कुमार सिंह यांच्या विजयानंतरही कुस्ती संघटनेतील ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दबदबा कायम असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा प्रतीक भूषण सिंह यानेही वडिलांच्या समर्थनार्थ पोस्टर झळकावले आहे. पोस्टरवर लिहिले आहे - "दबदबा तो है-दबदबा तो रहेगा, यह तो भगवान ने दे रखा है."

संजय कुमार सिंह यांना 40 मते मिळालीसंजय कुमार सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी यापूर्वीच दावा केला होता की, संजय सिंह कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होतील. दरम्यान, भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय कुमार सिंह यांच्या पॅनलचे बहुतांश उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुकीत संजय कुमार सिंह यांना 40 तर, अनिता शेओरान यांना फक्त 7 मते मिळाली. मात्र अनित शेओरान यांच्या पॅनलने सरचिटणीसपदी बाजी मारली आहे. प्रेमचंद लोचब यांनी दर्शन लाल यांचा पराभव केला आहे.

कुस्तीपटूंनी व्यक्त केली नाराजीब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी संजय कुमार सिंह यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केले आहे. आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून बरेच लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. ब्रिजभूषण शरण सिंह यांचा व्यावसायिक भागीदार आणि जवळचा सहकारी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यामुळे मी कुस्ती सोडून देईन, असे साक्षी मलिक हिने म्हटले आहे. तर विनेश फोगट म्हणाली की, अपेक्षा खूप कमी आहेत पण आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे हे खेदजनक आहे. आपले दु:ख कोणाकडे मांडायचे?

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहWrestlingकुस्ती