शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

देशांतर्गत विमानप्रवास १६ टक्क्यांनी महागणार; केंद्र सरकारकडून किमान प्रवासभाड्याची मर्यादेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 07:21 IST

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. किमान प्रवासभाडे वाढविण्यात आले असले, तरीही कमाल प्रवासभाड्याची मर्यादा बदलण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली/मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या भडकलेल्या क‍िमतींमुळे सर्वसामान्यांवर रडण्याची वेळ आली आहे. त्यातच आता देशांतर्गत विमानप्रवासही महागणार आहे. केंद्र सरकारने किमान प्रवासभाड्याची मर्यादा १६ टक्के वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे किमान भाडे १३ ते १६ टक्क्यांनी वाढणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. किमान प्रवासभाडे वाढविण्यात आले असले, तरीही कमाल प्रवासभाड्याची मर्यादा बदलण्यात आलेली नाही. प्रवासभाड्याच्या सीमा गेल्या वर्षी २५ मेपासून विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यानंतर निर्धारित करण्यात आली होती. नवे बदल १ जूनपासून अंमलात येतील. त्यानुसार, ४० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान प्रवासभाडे २,३०० रुपयांऐवजी २,६०० रुपये निर्धरित करण्यात आले आहे, तर ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी ३,३०० रुपये किमान प्रवासभाडे आकारण्यात येतील. दुसऱ्या लाटेमुळे घेतला निर्णयकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रवासी संख्या घटली आहे. सरकारने १ जूनपासून प्रवासी क्षमता सध्याच्या ८० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणली आहे. सरकारच्या निर्देशांनुसार उड्डाणांची संख्याही घटविण्यात येणार आहे. त्यामुळे १ जूननंतर तिकिटे रद्द होण्याची शक्यता आहे. विमान कंपनी प्रवाशांना पर्यायी विमानात जागा उपलब्ध करून देण्यात येईल किंवा प्रवासभाडे परत करण्यात येईल, तसेच प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलण्याची एक मोफत संधी देण्यात येईल.नवीन दरपत्रक (किमान भाडे)४० मिनिटांपर्यंत - २६०० रुपये४० ते ६० मिनिटे - ३३०० रुपये६० ते ९० मिनिटे - ४००० रुपये९० ते १२० मिनिटे - ४७०० रुपये१२० ते १५० मिनिटे - ६१०० रुपये१५० ते १८० मिनिटे - ७४०० रुपये१८० ते २१० मिनिटे - ८७०० रुपयेनुकसान झेलणाऱ्या कंपन्यांना दिलासा प्रवासभाडे वाढविण्यात आल्यामुळे कोरोना महामारीच्या काळात आर्थ‍िक नुकसान सहन करणाऱ्या विमान कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना संसर्गाच्या देशात आलेल्ल्या सऱ्या लाटेमुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.