शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'डोकलाम'सारखे आणखी प्रयत्न करू शकतो चीन, जवानांना सज्ज राहण्याच्या सूचना : लष्करप्रमुख बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 08:24 IST

भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना जवानांना दिल्या आहेत

पुणे, दि. 27 -  ‘‘भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना जवानांना दिल्या आहेत,’’ असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे जनरल बी. सी. जोशी मेमोरिअल व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. ‘वर्तमानातील भू-सामरिक स्थितीतील भारतासमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एन. हॅरिस, संरक्षण आणि सामरिक विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, उपस्थित होते.रावत म्हणाले, की दहशतवाद आणि कट्टरतावाद वेगाने वाढत आहेत. आशिया खंड जगाचे केंद्र बनत आहे. जगात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन राजकीय, आर्थिक आणि लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही देशांत डोकलाम प्रश्नावरून तणावपूर्ण वातावरण आहे. सीमा अस्पष्ट असल्याने चीन अनेक भागांवर मालकी हक्क सांगत आहे. त्यामुळेच भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा होऊ शकतात. फाळणी आणि वसाहतवादी धोरणामुळे काश्मीरप्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तान छुप्या युद्धाद्वारे काश्मीर अशांत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कट्टरपंथीय छुप्या पद्धतीने मदत करीत आहेत. देशातील आंतरिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अशा घटकांना नष्ट करणे महत्त्वाचे असल्याचेही रावत यांनी सांगितले.चीन आणि भारतातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करांचा संयुक्तिक सराव घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी भारताने चीनच्या सैनिकांना सरावासाठी आमंत्रित केले होते. या वर्षी चीनकडून हा प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप कुठलेच निमंत्रण आलेले नाही. - बिपिन रावत, लष्करप्रमुख.

टॅग्स :DoklamडोकलामJammu Kashmirजम्मू काश्मिरchinaचीन