शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पाहुणे डोनाल्ड ट्रम्प येती घरा; कुत्रे, नीलगायी 'गायब' करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:05 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीआधी प्रशासन लागलं कामाला

अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पभारत दौऱ्यावर येत आहेत. यासाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये विशेष तयारी सुरू आहे. ट्रम्प फक्त तीन तास अहमदाबादमध्ये असतील. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये मोठी लगबग सुरू आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. ट्रम्प यांना झोपड्या दिसू नयेत, यासाठी झोपड्यांसमोर भिंत बांधण्यात आल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता ट्रम्प यांच्या वाटेत कुत्रे, नीलगायी येऊ नयेत, यासाठीही विशेष काळजी घेतली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये असतील. त्यांच्या तीन तासांच्या दौऱ्यावर १०० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या वाटेत कुत्रे, नीलगायी येऊ नयेत, यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. लोकांनी पान खाऊन भिंतीवर थुंकू नये, यासाठी पानाच्या गाद्यादेखील बंद करण्यात आल्या आहेत. २०१५ मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अहमदाबादमधील प्रशासकीय यंत्रणेनं कंबर कसली आहे. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी 'वायब्रंट गुजरात'मधील कार्यक्रम आटपून विमानतळाच्या दिशेनं परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारसमोर अचानक एक कुत्रा आला. केरी यांच्या कारनं कुत्र्याला धडक दिली. त्यामुळे प्रशासनावर मोठी नामुष्की ओढावली. याची पुनरावृत्ती होऊ टाळण्यासाठी आज पशुपालन विभागानं बैठक बोलावली आहे. कुत्र्यांसह इतर प्राण्यांना व्हीव्हीआयपी मार्गांपासून दूर ठेवण्यासाठीची योजना या बैठकीत आखली जाऊ शकते. विमानतळापासून स्टेडियमकडे जाण्यासाठी रस्त्यानं एक किलोमीटर प्रवास करावा लागतो. या भागात नीलगायींची संख्या लक्षणीय आहे. नीलगायी रस्त्यावर येऊ नयेत म्हणून वन विभागाची तयारी सुरू आहे. व्हीव्हीआयपी मार्गापासून कुत्रे, नीलगायी आणि इतर प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी अहमदाबाद महापालिकादेखील कामाला लागली आहे. मोकाट प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिका एक विशेष पथक तैनात करणार आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारत