शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आईसमोर चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला; पोट फाडले, डॉक्टरही वाचवू शकले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 20:49 IST

3 कुत्र्यांनी घेरुन मुलावर हल्ला केला, आई येईपर्यंत शरीराचे लचके तोडले

नोएडा: नोएडाच्या लोटस बुलेवर्ड सोसायटीत सोमवारी सायंकाळी एक वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात कुत्र्यांनी मुलाचे पोट फाडले, त्यामुळे त्याचे आतडे बाहेर आले. कसेबसे कुत्र्यांपासून बाळाला वाचवल्यानंतर सोसायटीतील लोकांनी त्याला नोएडा येथील रिअॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, शस्त्रक्रिया करूनही मुलाला वाचवता आले नाही.

3 कुत्र्यांचा घेरून हल्ला सोसायटीतील धरमवीर यादव यांनी सांगितले की, राजेश आणि त्याची पत्नी सपना सेक्टर-110 मध्ये राहतात. या जोडप्याला एक वर्षाचे मूल(अरविंद) होते. सोमवारी सपना मुलासोबत लॉट्स बुलेवर्ड सोसायटीच्या गार्डनमध्ये आली. यावेळी टॉवर 30 जवळ 3 कुत्र्यांनी मुलाला घेरले. मुलाला कुत्रा चावला तेव्हा सपना तिथेच होती. मुलाची ओरड ऐकून ती त्याच्याकडे धावली. तोपर्यंत अनेक ठिकाणाहून कुत्र्यांनी मुलाच्या शरीराला चावा घेतला होता. त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. कसेबसे मुलाची सुटका झाली. मग त्याला दवाखान्यात नेले.

कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना सोसायटीत सोडलेकाही दिवसांपूर्वी महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी केल्याचे सोसायटीतील लोकांनी सांगितले. यानंतर त्याला पुन्हा येथे आणून सोडण्यात आले होते. सोसायटीचे रहिवासी विनोद शर्मा यांनी सांगितले की, तीन वर्षांपासून या कुत्र्यांचा त्रास आहे. कुत्रा चावण्याच्या घटना दर दोन महिन्यांनी होतात. लोक येतात आणि कुत्र्यांना खायला घालतात. आता ते मनुष्यभक्षक झाले आहेत. 

गेल्या काही महिन्यात अशा घटनांमध्ये वाढ

  • लखनौमध्ये कुत्र्याने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावाघेतला होता. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तो तरुण 2 दिवस अॅडमिट होता.
  • गाझियाबादमध्येही बागेत खेळणाऱ्या मुलावर पिटबुलने हल्ला केला होता. मुलाच्या चेहऱ्यावर 150 टाके लागले.
  • गाझियाबादमध्येच लिफ्टमध्ये कुत्र्याने एका मुलावर हल्ला केला होता. त्या कुत्र्याची मालकिन तिथेच उभी होती.
  • नोएडामध्येही लिफ्टमध्ये कुत्र्याने डिलीव्हरी बॉयच्या प्रायवेट पार्टवर चावा घेतला.
  • 13 जुलै रोजी लखनौमध्ये पिटबुलच्या हल्ल्यात 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, ती महिलाच त्या कुत्र्याची मालकीन होती. 
टॅग्स :dogकुत्राDeathमृत्यू