सूर्या पाणी पुरवठ्याच्या कामांना ‘गुपचूप’ सुरुवात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 02:37 AM2018-04-25T02:37:07+5:302018-04-25T02:37:07+5:30

मेंढवान सोमटा येथे काम करणाºया कर्मचारी व मुकादम यांना शेतकºयांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

Does the sun begin to 'secretly' work on water supply? | सूर्या पाणी पुरवठ्याच्या कामांना ‘गुपचूप’ सुरुवात?

सूर्या पाणी पुरवठ्याच्या कामांना ‘गुपचूप’ सुरुवात?

Next

मनोर : पालघर जिल्हातील हजारो शेतकरी व आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसून मेंढवन सोमटा येथे सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामांना शासनाने सुरुवात केली आहे. काम थांबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले होते. मात्र, गुपचूप काम सुरु झाल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. या बाबत उपजिल्हाधिकारी झरे यांना विचारले असता, ‘सदर काम एमएमआरडीएचे असल्याने त्या बाबत माहती नाही. मंत्रायात चौकशी करुन सांगतो’ असे उत्तर दिले आहे.
दरम्यान, मेंढवान सोमटा येथे काम करणाºया कर्मचारी व मुकादम यांना शेतकºयांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी शेतकरी व त्यांच्यात हुज्जत झाली. सूर्या धरणाचे पाणी मीरा भार्इंदर , वसई-विरारला नेण्या साठी एमएमआरडीए मार्फत मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत नांदगाव तर्फे मनोर, अवढाणी वाडे खडकोना परिसरात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू केले होते. त्यास पाणी बचाव संघर्ष समिती, कष्टकरी संघटना, भूमिसेना व इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर २९ मार्च रोजी बेमुदत उपोषणाला सुरवात केली होती. त्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिरुन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी ४ एप्रिलपर्यंत काम थांबविण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, संघर्ष समितीच्या सदस्यांनी राज्यपाल विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती.

त्या मशिन सर्वेक्षणासाठी
पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत पाटील म्हणाले की, एमएमआरडीएने ड्रिलिंगचे काम सुुुरु केले आहे. त्याला आमचा विरोध आहे. आमच्याशी संवाद न साधता काम सुरु केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. नानवरे यांनी सांगितले की, त्या मशनरी सर्वेक्षणासाठी आहेत. काम सुरु झालेले नाही. दरम्यान, पाणी पुरवठा योजनेचा निर्णय मुख्यमंत्र्याचे अख्त्यारीत असताना देखील पाईपलाईन सर्वेक्षण व ड्रीलिंगच्या कामाला सुरु वात झाल्याने शेतकरी व आंदोलकांमध्ये असंतोष पसरला आहे. मनसे तालुका उपाध्यक्ष जबी राऊत म्हणाले की, कोणताही निर्णय होण्या आधी हे काम सुरु झालल्याने आंदोलकांची फसवणुक झाली असून आता हे आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल.

Web Title: Does the sun begin to 'secretly' work on water supply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.