शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

राफेलच्या प्रश्नांवर मोदींचं तोंड बंद का ?-  राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 00:13 IST

अहमदाबाद- गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय उलथापालथ सुरू आहेत. जनतेसमोर सभा घेऊन काँग्रेस व भाजपा एकमेकांवर कुरघोडी करत असतात.

अहमदाबाद- गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय उलथापालथ सुरू आहेत. जनतेसमोर सभा घेऊन काँग्रेस व भाजपा एकमेकांवर कुरघोडी करत असतात. त्याप्रमाणेच ट्विटरवरूनही भाजपा व काँग्रेसवाल्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू असते. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना शब्दांच्या आडून शालजोडीतले हाणत असतात.काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधींनी मोदींना ट्विटरच्या माध्यमातून उपरोधिक टोला हाणला आहे. चेहरे पर शिकन, माथे पर पसीना, डरे-डरे से साहेब नज़र आते हैं, शाह-जादा, राफेल के सवालों पर जाने क्यूँ इनके होंठ सिल जाते हैं, असं ट्विट करत राहुल गांधींनी एकाच वेळी तिघांवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी या ट्विटमधून नरेंद्र मोदी, अमित शाह व त्यांचे पुत्र जय शाह यांनाही लक्ष्य केलं आहे. 

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या या टप्प्यात काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून, भाजपाला त्याचीच चिंता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही भाजपासाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यानंतर बड्या नेत्यांचे सामने राज्यात पाहायला मिळतायत. सध्या काँग्रेस आणि भाजपा एकमेकांना गुजरातविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांचा दौरा महात्मा गांधी की जन्मस्थळ असलेल्या पोरबंदरहून सुरू झाला आहे. राहुल गांधींनी या दौ-यात मच्छीमारांचे प्रश्न, त्यांना मिळणा-या डिझेलवरील उठवण्यात आलेली सबसिडी, शेतक-यांच्या समस्या, बेरोजगारीचा प्रश्न आणि टाटांच्या नॅनो प्रकल्पाला देण्यात आलेले ३३ हजार कोटी यावरून भाजपावर हल्ला चढवला आहे. काळा पैसा नष्ट करण्याच्या नावाखाली देशातील गरिबांना बँकांच्या रांगेत उभे करणा-या मोदी सरकारने १0-१२ उद्योगपतींचे भले केल्याचा आरोप त्यांनी केला आणि गुजरातमध्ये उच्च शिक्षण व आरोग्य सेवा महाग करायला भाजपा सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. हे सर्व मुद्दे उपस्थित करून भाजपा गुजरातविरोधी असल्याचे ते सर्व सभांतून मतदारांच्या मनात बिंबवत होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस